प्रत्येकजण काही न काही आर्थिक बचत करत असतात. पगारातील (Invest) एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतात. ही रक्कम जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवले तर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. तुम्ही सरकारी योजनेत गुंतवणूक केली तर सुरक्षित असते. त्यामध्ये कोणतीही जोखीम नसते.पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. या योजनेत रोज फक्त २०० रुपये गुंतवून तुम्ही १० लाख रुपये जमा करु शकतात. त्यामुळे कमीत कमी गुंतवणूकीत जास्तीत जास्त परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याज मिळणार आहे.(Invest)या योजनेत तुम्ही फक्त १०० रुपये गुंतवून अकाउंट ओपन करु शकतात. पोस्टाच्या बचत योजनेत स्वतः सरकार गॅरंटी देते. त्यामुळे चांगली कमाई होते.पोस्टाच्या या योजनेत मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे. तुम्ही अजून ५ वर्षांपर्यंत वाढवू शकतात. या योजनेत लहान लहान गुंतवणूक करुन तुम्ही चांगला फंड जमा करु शकतात. या योजनेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अकाउंट उघडू शकतात.
तुम्ही २०० रुपये रोज गुंतवले तर १० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करु शकतात. (Invest) तुम्ही दररोज २०० रुपये गुंतवले तर महिन्याला ६००० रुपये गुंतवणार आहात. म्हणजेच पाच वर्षात तुम्ही ३,६०,००० रुपये गुंतवू शकतात. यावर ६८,१९७ रुपये व्याज मिळेल. तुम्ही अजून पाच वर्षात गुंतवणूक केली तर एकूण ७.२० टक्के रक्कम गुंतवता. त्यावर २,०५,१३१ रुपये व्याज मिळते.म्हणजेच दहा वर्षात १०,२५,१३१ रुपये तुम्हाला मिळणार आहेत.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश