देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा अनेकांची असते. (recruitment) जर तुमचीही इच्छा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन एअर फोर्समध्ये अग्नीवीर वायु पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अग्निवीर वायु INTAKE 01/2027′ या पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.हवाई दलातील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ जानेवारी २०२६ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत

हवाई दलातील या नोकरीसाठी अविवाहित तरुण आणि तरुण(recruitment)सहभागी होऊ शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी iafrecruitment.edcil.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.हवाई दलातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२वी पास केलेले असावे, याचसोबत गणित, भौतिकशास्त्र, इंग्रजी या विषयात ५० टक्के गुण मिळवलेले असावे. याचसोबत मॅकेनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ कंप्यूटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स केलेला असावा.

सर्वात आधी iafrecruitment.edcil.co.in या वेबसाइटवर जायचे आहे.(recruitment)यानंतर Online Registration For AGNIVEERVAYU INTAKE 01/2027 वर जायचे आहे.यानंतर IAF Agniveer Vayu 01/2027 चा लॉगिन डॅशबोर्ड दिसेल. त्यावर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.यानंतर तुमची माहिती भरा. शैक्षणिक पात्रतेसंदर्भात कागदपत्र अपलोड करा.यानंतर फोटो आणि सही स्कॅन करुन अपलोड करा. फॉर्म भरल्यावर त्याची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश