आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या मागे अनेक आजार लागलेत. (diabetes) यामध्ये कॅन्सर, मधुमेह, डायबेटीज यांसारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चुकीचा आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे या आजारांमध्ये चांगलीच वाढ होतेय. दक्षिण आशियाच्या लोकसंख्येमध्ये मधुमेह, रक्तदाब आणि मेटाबॉलिक सिंड्रोम या समस्या अनुंवाशिक पद्धतीने असते. त्यामुळे त्या ठिकाणच्या मुलांमध्ये अधिक लठ्ठपणा, कमी वयात मधुमेह आणि हृदयरोग यांची लक्षणं दिसून येतात.

भारतात मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा मेटाबॉलिक सिंड्रोमची स्थिती (diabetes) जगातील इतर भागांपेक्षा अधिक भयावह आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक १० व्यक्तींपैकी ३ व्यक्तींना मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या असणार आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर यावर वेळीच उपाय केले नाहीत तर ही परिस्थिती येत्या काळात अजून धोकादायक असू शकते. यावर जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल, जंकफूडचं सेवन न करणं, जेवणात तेलाचा कमी वापर याशिवाय नियमित व्यायाम आणि रेग्युलर हेल्थ चेकअप हे उपाय आहेत.
अयोग्य आहार
आजकाल कामाच्या वेळा आणि जीवनशैलीमुळे लोकं जेवणाच्या वेळा पाळत नाही. त्याचप्रमाणे आहारात पौष्टिक पदार्थ घेण्याऐवजी साखरयुक्त पदार्थ, जास्त मीठ असलेले पदार्थ तसंच प्रोसेस्ड फूड यांचा समावेश असतो. यामुळे मधुमेह आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतं.
व्यायामाचा अभाव
लोकांच्या बिझी शेड्युलमुळे बैठ्या जीवनशैलीचं प्रमाण वाढलं आहे. त्याचप्रमाणे लोकं व्यायाम देखील करत नाहीत. व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढतो आणि इतर आजारांच्या प्रमाणात वाढ होते.
ताणतणाव
नोकरी करणाऱ्या किंवा अनेक बिझनेस करणाऱ्या व्यक्तींना ताणतणाव असतो. (diabetes) मानसिक ताणतणावाचा थेट परिणाम ब्लड प्रेशरवर पडतो. तसंच इन्सुलिनवर परिणाम होत असल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.
लठ्ठपणा
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वाढलेलं वजन उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही समस्याचं प्रमुख कारण आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश