कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी

चांगले शिक्षण घेतलंय, कोणतही काम करण्याची क्षमता आहे.(ability) पण तरीही मनासारखा काही घडतच नाही. किंवा समोर त्याला सर्व काही मिळतय. तो वेगाने प्रगती करतोय. आपल्या हातात मात्र सतत अपयशाचा नारळ. असे आपल्याच बाबतीत काय घडतंय? असा समोर प्रश्न येतो आणि त्याचे काहीच समाधानकारक उत्तर मिळत नाही. मग उपास तपास सुरू होतात. नवस सायास केले जातात. मग अंगारे धुपारे सुरू होतात. आणि मग यातून काहीच निष्पन्न होत नाही असं म्हटल्यावर मंत्र तंत्र करणाऱ्या भोंदू बाबाकडे पाऊले वळतात. अंधश्रद्धेतून सुरू झालेली ही पायवाट थांबवण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकराना आपले बलिदान द्यावे लागले पण अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचा बाजार आजही सुरूच आहे.सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे.अनेक मातब्बर उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या रेंदाळ मतदार संघातून शिवसेनेचे एक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांचा फोटो वापरून करणी धरणी केल्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे.

पिवळा भात, त्यावर काळा बुक्का,काळी बाहुली, हिरव्या मिरच्या, लिंबू, टाचणी, (ability)उमेदवाराचा फोटो असे साहित्य यळगूड रस्त्यावरील एका स्टील विक्रीच्या गोडाऊन समोर अमावस्येच्या रात्री आढळून आले. सोमवारी हा प्रकार अनेकांनी पाहिला आणि कुणीतरी हुपरी पोलीस ठाण्यात त्याची माहिती दिली. संबंधित उमेदवाराचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव व्हावा या हेतूने कुणीतरी अज्ञाताने हा प्रकार केलेला आहे. वास्तविक अशी भानामती किंवा करणी धरणी मंत्र तंत्र केल्याने उमेदवारांचा पराभव होत असेल तर सर्वच मंडळी असा प्रकार करतील आणि मग कुणीच निवडून येणार नाही. जे अशक्य आहे ते शक्य कधीच होणार नाही. पण तरीही असे प्रकार होतच राहतात.चारच दिवसापूर्वी ग्रामीण भागातील एका गावातील स्मशानभूमीमध्येएक‌ तृतीयपंथी व्यक्ती नग्न होऊन काहीतरी काळी पूजा करत असल्याचा प्रकार गावकऱ्यांनीच उघडकीस आणला आणि त्यात तृतीय पंथी व्यक्तीला पोलीस ठाण्यात हजर केले. कुणाच्यातरी सांगण्यावरून तो या स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री काळी पूजा करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

लिंबू उतरून टाकणे, भाकरीला हळद कुंकू लावून रस्त्याच्या कडेला टाकणे, (ability)लिंबूला टाचण्या टोचणे आणि तो लिंबू तिकटीवर ठेवणे. दुरडीमधे पिवळा भात ठेवून भातावर उदबत्ती खोचणे, भाताच्या मध्यभागी लिंबू ठेवणे. याला उतारा असे म्हणतात. तो ओढ्याच्या काठी किंवा नदीच्या काठी ठेवला जातो. अशाच प्रकारची परडी असते. परडीमध्ये कणकीचा दिवा करून तो ठेवून ही परडी नदीच्या पात्रात सोडली जाते. कोल्हापुरातल्या पंचगंगेच्या घाटावर किंवा अन्य जिल्ह्यातील नदीच्या काठावर दर सोमवारी काही जणांकडून” साती आसरा” पूजा विधी केला जातो. एक जिवंत कोंबडीचे पिलू सोडले जाते. आणि मोठी कोंबडीकापली जाते. नदीच्या काठावरच जेवण केले जाते आणि एका परडीमध्ये नैवेद्य ठेवून ती नदीच्या पात्रात सोडली जाते. असे प्रकार दर सोमवारी कोणत्याही नदीच्या काठावर हमखास पाहायला मिळतात. हा अंधश्रद्धेचा प्रकार असला तरी तो राजरोसपणे केला जातो. कोणत्याही शहरातल्या किंवा ग्रामीण भागातल्या स्मशानभूमीचा परिसर हा गुढ रम्य असतो. कुणाच्यातरी अग्निसंस्कारासाठी लोक तिथे रात्री मध्यरात्री किंवा दिवसा जात असतात. पण उगाच कोणतेही कारण नसताना स्मशान भूमीकडे कोणीही फिरकत नाही. करणी आणि धरणी, भानामती करण्यासाठी अशाच स्मशानभूमीचा परिसर निवडला जातो. भूत प्रेताच्या गोष्टी सांगताना गावच्या स्मशानभूमीचाच परिसर निवडला जातो.

या जगात भूत पिशाच्च वगैरे काही नाही. भूतांची पालखी नसते. (ability)या सर्व भ्रामक कल्पना आहेत. असे प्रत्येक जण म्हणतो आणि तोच केव्हा तरी त्याच्या बापजाद्यांनी सांगितलेल्या भुताखेताच्या गोष्टी सांगत असतो. मी ऐकलंय, पण तसं काही नसतं असे सांगणारेच केव्हातरी आपल्याच सावलीला घाबरलेले असतात. भूत प्रेत, मंत्र तंत्र, भानामती, करणी हे सर्व प्रकार विज्ञानाने खोटे ठरवलेले आहेत. विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर या भ्रमक कल्पना उतरत नाहीत.दर अमावस्येला दुचाकी आणि चार चाकी वाहनांची पूजा केली जाते. लिंबू मिरच्या वाहनाला लावल्या जातात. हा प्रकार सुद्धा अंधश्रद्धेचाच एक भाग आहे
पण तरीही अगदी उच्चशिक्षित लोकांच्याकडूनही लिंबू मिरची लावण्याचा प्रकार केला जातो.खरे तर दुचाकी किंवा चार चाकी वाहन महिन्यातून किमान दोन वेळा तरी स्वच्छ धुवावे हे त्यामागचे कारण आहे. पण त्यासाठी दिवस निवडला जातो तो अमावस्येचाच. वाहन धुतल्यानंतर वाहनाच्या पाठीमागे किंवा पुढे लिंबू मिरची बिब्बा लावण्यात काय अर्थ आहे?
अशा प्रकारच्या घडामोडी अधून मधून घडत असतात.

त्यातूनच मग अंधश्रद्धेला सुरुवात होते. श्रद्धा कुठली आणि (ability)अंधश्रद्धा कोणती यातील फरकच कळेनासा होतो. गुप्तधन शोधणे, त्यासाठी विधी करणे पैशाचा पाऊस पाडणे हे सर्व प्रकार कालही होते आजही सुरू आहेत पुढेही चालूच राहतील. स्मशानभूमी मधली नग्न पूजा, भानामती ही अंधश्रद्धा सुद्धा अशीच चालू राहणार आहे. तिकडे दुर्लक्ष करणे, आणि अंधश्रद्धे विरुद्धआपणाला जमेल तेवढे लोकप्रबोधन करणे इतकेच आपल्या हाती आहे. मंत्र तंत्र विरोधी, अंधश्रद्धे विरोधी महाराष्ट्राने कायदा केला आहे. पण तरीही हा कायदा हातात घेतला जातो आहे. एका अर्थाने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा रोज पराभव होताना दिसतो आहे हीच खरी शोकांतिका म्हणावी लागेल.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश