हातकणंगले/प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (hardship)घेतलेल्या एका निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चे कारण देत दिग्गज नेत्यांच्या मुलांना बाजूला सारणाऱ्या भाजपचा नियम इचलकरंजीच्या आवाडे कुटुंबीयांच्या बाबतीत शिथिल झाल्याचे दिसत असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

अलीकडेच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीवेळी (hardship)भाजपने एक कडक धोरण जाहीर केले होते. “आमदार किंवा खासदार यांच्या मुलांना निवडणूक लढवता येणार नाही,” असा पवित्रा घेत पक्षाने कृष्णराज महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला लावली होती. पक्षाच्या शिस्तीचा आदर करत महाडिक यांनी त्यावेळी माघार घेतली, मात्र आता जिल्हा परिषदेच्या तोंडावर भाजपची ही ‘शिस्त’ नेमकी कुठे गेली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सानिका आवाडेंच्या उमेदवारीने ठिणगी इचलकरंजी विधानसभा(hardship) मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे यांना भाजपने जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. एका नेत्याच्या मुलाला नियम लावायचा आणि दुसऱ्या नेत्याच्या कन्येला मात्र पायघड्या घालायच्या, या भाजपच्या दुटप्पी भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर भाजपच्या या भूमिकेवर सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांच्या अंतर्गत बैठकांमध्ये दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. “पक्षाचे नियम सर्वांसाठी समान का नाहीत? की नेत्यांच्या सोयीनुसार नियमांची व्याख्या बदलली जाते?” असा थेट प्रश्न विचारला जात आहे. महाडिक समर्थकांमध्ये या निर्णयामुळे सुप्त संताप दिसुन येत आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश