महापालिकांच्या निकालानंतर महापौरपदासाठी पक्ष उमेदवारांची संख्याबळाची (woman) जुळवाजूळव करत आहेत. कोल्हापुरातील महापालिकेत सत्तेचं गणित सुटत नाही तोच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शिंदेंनी डाव टाकत नाराज उमेदवार शीतल फराकटे यांनी आपल्या पक्षात प्रवेश दिलाय.राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करताच शीतल फराकटे यांनी अजितदादांच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय. ज्या पक्षासाठी आणि ज्या नेत्यांसाठी मी अनेक वर्ष दिवस रात्र एक केला त्याच पक्षाने माझी उमेदवारी नाकारली. मी केवळ उमेदवारी मिळाली म्हणून राष्ट्रवादी सोडलेली नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी मी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. शीतल फटाके या आधी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान आता शीतल फराकटे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीत असताना ज्याप्रकारे सभा गाजवल्या, जशा आक्रमकपणे शैली होती त्याच शैलीत त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

माझा स्वाभिमान दुखावलेला आहे, मी माघार घेतली असती तर मी तारा राणीची लेक कसली, (woman) असं म्हणत शीतल फराकटे यांनी आपल्या पक्षावर हल्ला चढवला. गेली तीन वर्ष हसन मुश्रीफ हे मला जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लाग असे सांगत होते, मात्र असं काय झालं की त्यांनी माझी उमेदवारी नाकारलीय. माझा स्वाभिमान दुखावलेला आहे, मी माघार घेतली असती तर मी तारा राणीची लेक कसली.मी केवळ उमेदवारी मिळाली म्हणून राष्ट्रवादी सोडलेली नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी मी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. मी राष्ट्रवादी पक्षात असताना जी माझी शैली होती जो माझा बाणा होता तोच शिवसेनेतही राहणार आहे. मला आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फोनवरून नेमकं काय झालं याचं कारण विचारल्याचं शीतल फटाके म्हणाल्या.
दरम्यान शीतल फाटके या हसन मुश्रीफ यांच्या विश्वासू नेत्या होत्या. (woman) त्यामुळे ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी शीतल फाटकेंचा शिवसेनेत प्रवेश करणं हा हसन मुश्रीफांसाठी धक्का मानला जात आहे. “माईक घेऊन सभा गाजवल्या, पण हक्काची उमेदवारी मागताच डावलले,” अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. उमेदवारी नाकारल्यानंतर शीतल फराकटे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. “आधी शब्द दिला आणि ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला,” असा आरोप करत त्यांनी मंत्र्यांवर तोफ डागली होती.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश