कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी
इराण अमेरिका संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल इराण मधील तणाव,(Greenland)व्हेनेझुएलावर अमेरिकेचा कब्जा, आणि आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याची अमेरिकेकडून सुरू असलेली तयारी, ग्रीन लँड मध्ये सात देशांचे प्रतिनिधिक स्वरूपात उतरलेले सैनिक, ह्या आंतरराष्ट्रीय घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. व्हेनेझुएला कारवाईनंतर रशिया, चीन आणि उत्तर कोरिया या तीन राष्ट्रांनी एकत्र येऊन डोनाल्ड ट्रम्प यांना निर्वाणीचा दिलेला इशारा हा जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने येत आहे आणि त्याला ट्रम्प यांचा विस्तारवाद कारण ठरतो आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलसन मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेने अटक करून न्यूयॉर्कमधील तुरुंगात डांबले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपण व्हेनेझुएला या राष्ट्राचे प्रमुख आहोत असे घोषित करून या राष्ट्राला गिळंकृत केलेले आहे.

व्हेनेझुएलाचा घास घेतल्यानंतर आता त्यांची वक्रदृष्टी ग्रीनलँड वर पडली आहे(Greenland) सामरिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले हे जगातील सर्वात मोठे बेट आता डोनाल्ड ट्रम्प यांना हवे आहे. ते ताब्यात घेण्याची तयारी अमेरिकेकडून सुरू आहे. अमेरिकेच्या विस्तारवादी भूमिकेमुळे नाटो संघटना तसेच संयुक्त राष्ट्र संघही चिंताग्रस्त बनला आहे. त्यामुळे डेन्मार्कसह सात देशांनी ग्रीनलँड वर प्रातिनिधिक स्वरूपात आपले सैनिक उतरवले असून त्यांच्याकडून युद्ध सराव सुरू आहे. अमेरिकेने ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल असा इशारा या सात राष्ट्रांनी दिलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या जानेवारी महिन्यात अमेरिकेची सत्ता सूत्रे हाती घेतली आहेत. राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याकडून वादग्रस्त निर्णय घ्यायला सुरुवात झाली आहे. अगदी सुरुवातीला त्यांनी टेरिफ कार्ड हे व्यापारी अस्त्र बाहेर काढले. अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या देशांवर त्यांनी 25% पासून 200 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क अर्थातच टेरिफ लावले आहे.
रशियाकडून भारताने इंधन खरेदी थांबवली पाहिजे. अन्यथा भारतावर (Greenland)भरमसाठ आयात शुल्क लावण्याची त्यांनी धमकीच दिली आहे. पण या धमकीला भीक न घालता भरताने रशियाकडून स्वस्त दरात इंधन खरेदी चालूच ठेवली आहे. अशाच प्रकारची धमकी त्यांनी अन्य राष्ट्रांनाही दिलेली आहे. व्हेनेझुएलावर कब्जा केल्यानंतर आणि आता ग्रीन लँड ताब्यात घेण्याची तयारी सुरू केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्वे देशाला एक पत्र पाठवून मी आता शांतता प्रक्रियेत असेलच असे नाही. कारण आठ पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये युद्धबंदी करून शांतता प्रस्थापित केली, पण शांततेचे नोबेल आपल्या देशाकडून मला जाहीर झाले नाही. याबद्दल ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि आता मी शांततेसाठी व्यक्त व्हायला उपलब्ध असणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंत महाशयांचा हा इशारा ग्रीनलँड बद्दलचा आहे. कोणत्याही स्थितीत आम्ही ग्रीनलँड ताब्यात घेऊ असा अप्रत्यक्ष इशारास त्यांनी दिला आहे. त्यांच्याकडून ही कारवाई झाली तर त्याचे जागतिक स्तरावर प्रतिकूल परिणाम होणार आहेत. ट्रम्प यांची ही कारवाई उंटाच्या पाठीवरील ओझ्यावरची शेवटची काडी ठरू शकते. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ते स्वायत्त असले तरी तेथे संसद आणि सरकार असले तरी डेन्मार्क राजेशाही शी तो जोडला गेला आहे. संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार याची जबाबदारी डेन्मार्क वर आहे. ग्रीनलँड मध्ये ८० टक्के भाग हा बर्फाच्छादित आहे. या बेटावरील लोकसंख्या 56 हजार आहे. इथे रस्ते नाहीत त्यामुळे लोकांना विमान, हेलिकॉप्टर किंवा बोटीने दळणवळण करावे लागते.
नुक या नावाची राजधानी आहे आणि ईनूक जातीचे लोक तेथे राहतात. (Greenland) या बेटावर भरपूर प्रमाणावर खनिजे आहेत. ग्रीनलँड हे भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेशी जवळ आहे. उत्तर अटलांटिक महासागरात ते कॅनडाच्या जवळ आहे. ग्रीनलँड मध्ये दिनांक 25 मे ते 25 जुलै या दरम्यान मध्यरात्रीचा सूर्य उगवतो. सामरिक दृष्ट्या हे जगातील सर्वात मोठे बेट अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे ते अमेरिकेला हवे आहे. पण ज्या बेटावर सरकार आहे, संसद आहे डेनमार्कने या बेटाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेने तेथे लष्करी कारवाई केली तर तो आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो. किंबहुना अमेरिकेची कृती जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकते.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश