राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे.(status) बारातमीत सभेसाठी येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टी न दिसल्यानं विमान कोसळलं आणि यात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर व्हॉटसअप स्टेटस एकाच शब्दात स्टेटस ठेवलंय. Devasted असं स्टेटस ठेवत सुप्रिया सुळे यांनी उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त केलीय.

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबिय दिल्लीतून (status) पुण्याच्या दिशेने येण्यासाठी निघाले आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त ते दिल्लीला गेले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर व्हॉटसअप स्टेटसला एकाच शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी Devasted असं व्हॉटसअप स्टेटस लिहिलंय.अजित पवार यांच्या अपघाती निधनावर प्रतिक्रिया देताना राज्यातील अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केवळ दादा गेले असे दोन शब्दात भावना व्यक्त केल्या. त्यांना अश्रू रोखता आले नाहीत. तर धनंजय मुंडे यांनीही वडील गेल्यासारखं दु:ख झाल्याचं म्हटलं. त्यांनाही अश्रू अनावर झाले.

अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणासाठी ओळखले जात होते.(status) पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची त्यांची सवय होती. बारामतीत आयोजित केलेल्या सभेसाठी ते सकाळी लवकर मुंबईहून निघाले होते. ८ वाजून ५० मिनिटांनी त्यांचं विमान बारामतीत उतरणार होतं. पण लँडिंगवेळी विमान कोसळून भीषण अपघात झाला. यात अजित पवार यांचं निधन झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करताना म्हटलं की, अजित पवारांच्या निधनामुळे राज्याचं भरून न येणारं नुकसान झालंय.विमान अपघाताची चौकशी व्हायला हवी, ती नक्कीच होईल. यापुढेही अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत. आमच्या सहकाऱ्याचं यात निधन झालंय. महाराष्ट्रासाठी हा काळा दिन आहे. दुर्दैवी अशी ही घटना आहे. प्रत्येकाला सुन्न करणारा हा अपघात आहे. अजितदादा यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं हे आमच्यासाठी दु:खद असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा :

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!

प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी