अजित पवारांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण राज्य हादरलं.(death) अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये असणाऱ्या त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, बहीण- खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत विमान दुर्घटना आणि त्यानंकर झालेल्या या अप्रिय घटनेची माहिती पोहोचली आणि नेमकं काय आणि कसं व्यक्त व्हावं हेच या कुटुंबीयांना कळेना. इथं विमान दुर्घटनास्थळावरून अजित पवार यांचं पार्थिव प्रथम रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार कोलमडलेल्याच अवस्थेत बारामतीत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(death) यांनीसुद्धा सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करत बारामती गाठली. जिथं त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. मात्र आप्तेष्ठांना मिठी मारून एखाद्या लहान मुलाप्रमाणं रडणाऱ्या सुनेत्रा पवार यावेळी दोन्ही हात जोडून, आपल्यापुढं असणारं डोंगराएवढं दु:ख सावरत अगदी नि:शब्द होऊन प्रथमदर्शनी रुग्णालयातीलच एका खोलीत बसल्याचं पाहायला मिळालं.
शिंदे आणि फडणवीस यांच्यासाठीसुद्धा हा मोठा धक्काच होता.(death) त्यामुळं पवारांच्या पत्नीपुढं ही नेतेमंडळीसुद्धा तितकीच हतबल बसल्याचं पाहायला मिळालं. हा प्रसंग सावरून नेत तिथं सुप्रिया सुळे दाखल झाल्या, मात्र सुनेत्रा पवार यांच्या मनातील घालमेल त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसली आणि या भेटीदरम्यानचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होताच ते पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात कालवाकालव झाली
हेही वाचा :
मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!
प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…