मुंबईहून बारामतीकडे जात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (plane)यांच्या विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असतानाच नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर आदळले. या घटनेनंतर एव्हिएशन तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे मुद्दे समोर आणले आहेत. एव्हिएशन एक्स्पर्ट विशाल बांगरे यांनी सांगितले की अपघातग्रस्त विमान बंबार्डियरचे लियरजेट होते, ज्यातून अजित पवार यांनी यापूर्वीही अनेकदा प्रवास केला होता. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या वेळी धुक्यामुळे दृश्यता कमी होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पायलटने थेट लँडिंग करण्याऐवजी आधी एक फेरी मारली आणि नंतर धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला.

या प्रक्रियेदरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात(plane) येताच पायलटने ‘मेडे’ कॉल दिला होता. वैमानिक सहसा नियंत्रण पूर्णपणे सुटण्याची शक्यता निर्माण झाल्यावरच असा सिग्नल देतात. विशाल बांगरे यांच्या म्हणण्यानुसार, त्या क्षणी पायलटला जे सर्वात योग्य वाटले तेच निर्णय त्याने घेतले, कारण हवामानाची स्थिती सतत बदलत होती आणि धुक्यामुळे लँडिंग करणे अधिक कठीण बनले होते.
तज्ज्ञांनी स्पष्ट केले की उड्डाणापूर्वी विमानाची सर्व तपासणी केली जाते. (plane)पायलट स्वतः विमानाची स्थिती पाहतो आणि सर्व तांत्रिक क्लिअरन्स मिळाल्यानंतरच उड्डाणाला परवानगी दिली जाते. या प्रकरणातही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच विमान मुंबईहून रवाना झाले होते. त्यामुळे अपघात अचानक आणि अनपेक्षित परिस्थितीमुळे घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.दरम्यान, जर त्या वेळी दृश्यता स्पष्ट असती तर कदाचित हा अपघात टळू शकला असता, अशी चर्चा आता विमान क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, बारामतीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नागरिक जमले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उद्या बारामतीत येणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा :
मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!
प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…