रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व दिल्ली कॅपिटल्स (championship) यांच्यामध्ये आज ता. ५ वूमन्स प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. बंगळूरच्या संघाने २०२४मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहर उमटवली होती. यंदा त्यांचा संघ या स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेता होण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.दिल्लीच्या संघाने पहिल्या तीनही मोसमात अंतिम फेरीत प्रवेश केला; मात्र दोन वेळा मुंबई इंडियन्स, तर एक वेळा बंगळूरकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता चौथ्या प्रयत्नात त्यांचा संघ जेतेपदाचा ध्यास बाळगून आहे.

बंगळूर संघामध्ये एकापेक्षा एक असे दर्जेदार फलंदाज आहेत.(championship) कर्णधार स्मृती मानधना, ग्रेस हॅरीस, जॉर्जिया वॉल, रिचा घोष यांच्या समावेशामुळे बंगळूरचा संघ फलंदाजीत तगडा दिसून येत आहे. महत्त्वाच्या क्षणी यांच्यापैकी प्रत्येकाने छान कामगिरी करीत संघाला संकटातून बाहेर काढले आहे.बंगळूरचा गोलंदाजी विभागही तेवढाच कणखर आहे. नदीन दी क्लार्क व सायली सातघरे यांनी आतापर्यंतच्या लढतींमध्ये अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत ठसा उमटवला आहे. श्रेयांका पाटील हिची फिरकी गोलंदाजीही प्रभावी ठरली आहे. गौतमी नाईक हिनेही गुजरात जायंट्सविरुद्ध अर्धशतकी खेळी करीत बंगळूरच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
दिल्ली संघातील गोलंदाजांनीही छान कामगिरी केली आहे. (championship)मेरीझेन कॅप, चिनेली हेनरी, नंदनी शर्मा, श्री चरणी, स्नेह राणा, मिनू मणी या खेळाडूंना गोलंदाजीत आपली धमक दाखवावी लागणार आहे. बंगळूरच्या फलंदाजांना रोखून त्यांच्यावर वर्चस्व गाजवावे लागणार आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणारा अंतिम सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना बडोद्यामध्ये रंगणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर दिसणार आहे.
हेही वाचा :
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर