घरात सतत वाद-विवाद होणे, अनपेक्षित आर्थिक अडचणी निर्माण होणे किंवा वारंवार (believe) आरोग्याच्या तक्रारी वाढणे अशा गोष्टी घडू लागल्या की अनेक जण त्यामागे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असल्याचे मानतात. भारतीय पारंपरिक वास्तुशास्त्रात घरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी काही साधे पण महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत. त्यानुसार घरात काही वस्तू कधीही पूर्णपणे रिकाम्या ठेवू नयेत, कारण त्या समृद्धी, स्थैर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानल्या जातात.

वास्तुशास्त्रानुसार पर्स किंवा पाकीट हे केवळ पैसे (believe) ठेवण्याचे साधन नसून ते आर्थिक प्रवाहाचे प्रतीक मानले जाते. पाकीट नेहमी पूर्णपणे रिकामे ठेवू नये, त्यामध्ये किमान एक नोट किंवा नाणे असावे, असे सांगितले जाते. असे केल्याने आर्थिक स्थैर्य टिकून राहते आणि पैशाची आवक वाढते, अशी श्रद्धा आहे. अनेक जण या विश्वासामुळे आपले पाकीट कधीही रिकामे ठेवत नाहीत.

घरातील धान्याची कोठी किंवा डबे हे अन्नसंपन्नतेचे (believe) प्रतीक मानले जातात. स्वयंपाकघरात धान्य पूर्णपणे संपलेले असणे हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे तांदूळ, गहू किंवा इतर धान्याचे डबे शक्यतो भरलेले ठेवावेत, असा सल्ला दिला जातो. तसेच पोळी ठेवण्याचा डबा पूर्ण रिकामा नसावा, त्यात थोडे तरी अन्न शिल्लक असावे, असेही मानले जाते. यामुळे घरात अन्नाची आणि पैशाची कधीच कमतरता भासत नाही, अशी धारणा आहे.

पूजाघरातील जलपात्रालाही विशेष महत्त्व दिले जाते. देवाजवळ (believe) ठेवलेले पाण्याचे भांडे हे पवित्रतेचे आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले जाते. ते भांडे कधीही कोरडे नसावे, नेहमी स्वच्छ पाण्याने भरलेले असावे, असे वास्तुशास्त्र सांगते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांती मिळते, असा समज आहे.
या सर्व गोष्टी श्रद्धा आणि परंपरेवर आधारित असल्या तरी अनेक कुटुंबे आजही या नियमांचे पालन करतात. घर स्वच्छ, नीटनेटके आणि भरलेले ठेवणे हेच सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे मुख्य तत्त्व असल्याचे तज्ज्ञही सांगतात.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं