राजस्थानमधील जोधपूर येथे परदेशी पाहुण्यांसाठी शाही विवाहसोहळा पार पडला. यावेळी, भारतीय परंपरेपासून प्रभावित झालेल्या एका युक्रेनियन जोडप्याने हिंदू वैदिक विधींनुसार लग्न केलं. हे जोडपे गेल्या तीन ते चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, परंतु भारतीय परंपरेने प्रभावित झाल्यानंतर त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न(Marriage) करण्याचा निर्णय घेतला.

खरं तर, 72 वर्षीय वर स्टॅनिस्लाव आणि 27 वर्षीय वधू अँहेलिना पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले होते. ते भारतीय विधी आणि परंपरांनी इतके प्रभावित झाले की त्यांनी लग्नासाठी जयपूर, उदयपूर आणि जोधपूर यांच्यातील सूर्यनगरी असलेल्या जोधपूरची निवड केली. लग्नासाठी(Marriage) समन्वय साधणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी रोहित आणि दीपक म्हणाले की वधू अँहेलिना भारतीय रीतिरिवाज आणि परंपरांनी खूप प्रभावित होती, म्हणून त्यांनी प्रत्येक परंपरा निभावली.
बुधवारी जोधपूरमध्ये आल्यानंतर, लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. नवरदेव घोडीवर बसून पोहोचला होता. यानंतर वरमाला समारंभ झाला आणि त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारासह सात फेऱ्यांसह विवाह सोहळा संपला.वराने वधूला मंगळसूत्र घातले आणि सिंदूर भरला. भारतीय पोशाख परिधान केलेल्या या जोडप्याने लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्या आणि नंतर डान्स केला.

जोधपूर नेहमीच परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. त्याची वास्तुकला, मेहरानगड किल्ला आणि रंगीबेरंगी बाजारपेठ पर्यटकांना मोहित करतात. म्हणूनच अनेक परदेशी येथे लग्न करणे पसंत करतात.यापूर्वी, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी उम्मेद भवन येथे लग्न करत जोधपूरला प्रसिद्धीझोतात आणलं होतं.कंपनीचे प्रतिनिधी रोहित आणि दीपक म्हणाले की, युक्रेनहून आलेल्या या जोडप्याने भारतीय लग्नाच्या परंपरा मोठ्या उत्साहाने स्वीकारल्या. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांचं प्रेम स्पष्ट दिसत होतं.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेची e-KYC कशी करायची? कोणती कागदपत्रं लागणार
‘सलमान दररोज रात्री ऐश्वर्याला…’, मी स्वत: पाहिलेलं ‘या’ अभिनेत्रीचा मोठा खुलासा
ट्रॅफिकने घेतला चिमुकल्याचा जीव! 5 तास Ambulance एकाच जागी