इचलकरंजीत वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; वारंवार खंडित होणाऱ्या लाईटमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप

इचलकरंजी शहरात अलीकडच्या काही दिवसांपासून (supply) वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असून नागरिक आणि व्यापारी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः आज शनिवारच्या दिवशी दिवसभरात तब्बल बारा ते पंधरा वेळा वीज गेली आणि पुन्हा आली, त्यामुळे शहरातील उद्योगधंदे, दुकाने आणि लघुउद्योग पूर्णपणे विस्कळीत झाले. वारंवार होणाऱ्या या लोडशेडिंग आणि फ्लक्चुएशनमुळे अनेकांचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे धोक्यात आली असून मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, अचानक वीज गेल्यानंतर आणि पुन्हा सुरू (supply) झाल्यानंतर मशीनरी, कॉम्प्युटर, फ्रिज, मोटर्स यांसारख्या उपकरणांवर गंभीर परिणाम होत आहे. इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरात अशा प्रकारची अनियमितता म्हणजे थेट व्यवसायावर घाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेकांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की, वीजबिल भरण्यास थोडा उशीर झाला तर तत्काळ कनेक्शन तोडले जाते, परंतु वीजपुरवठ्यातील या बेपर्वाईसाठी मात्र कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही.

Maharashtra State Electricity Distribution Company Limited वर थेट आरोप करत(supply) नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे की, जर देखभाल किंवा दुरुस्तीचे काम करायचे असेल तर त्यासाठी निश्चित वेळ ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने काम का केले जात नाही. दररोज वारंवार वीज खंडित होण्यामागे नेमके कारण काय आहे, याबाबतही कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप वाढत आहे.या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाने नुकसानभरपाईची मागणी देखील पुढे आणली आहे. “वीजपुरवठ्याच्या या बेफिकीरीमुळे जर आमचे उपकरणे जळाली किंवा व्यवसायाचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल विचारला जात आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

 गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल