कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

भिकारी हा घटक काल होता, आज आहे आणि आणि उद्या सुद्धा असणार आहे.(economic)विषम आर्थिक व्यवस्था, काम करण्याची नसलेली इच्छा किंवा त्यासाठी नसलेले शारीरिक आरोग्य. किंचित किंवा जास्तीचे अपंगत्व यातून किंवा काही अपरिहार्य कारणातून भिकारी हा घटक निर्माण होत असतो. अलीकडच्या काळात भीक मागणे हा एक व्यवसाय बनला आहे. आक्रसलेला चेहरा, खोल गेलेले डोळे, किंचित किंवा जास्तीचे शारीरिक व्यंग, चेहऱ्यावर कमालीचे लाचारीचे भाव, मळलेले कपडे, किंवा ठिगळ लावलेले कपडे, हे झाले पुरुष भिकाऱ्याचे वर्णन.चेहरा रापलेला, केस विस्कटलेले, विटलेला सलवार कुर्ता किंवा मळकट काळपट साडी, चेहऱ्यावर दोन दिवसापासून काही खाल्लेले नाही असा भाव, झोळीत ठेवलेले दीड दोन वर्षाचे बाळ, किंवा कडेवर घेतलेले बाळ. त्याचाही “अवतार”काढलेला.

बाळ सतत रडत असलेले, आजारी असलेले, चेहऱ्यावर कमालीची लाचारी. अपंग भिकाऱ्याला, कडेवर रडणारे बाळ असलेल्या भिकारणीला शक्यतो दयाळू लोक भीक देत असतात. पूर्वी कोणताही भिकारी हा खाद्य स्वरूपातील भीक घेत असे. आता मात्र रोख पैशाची भीक त्यांच्याकडून स्वीकारली जाते. (economic)आता हे भिकारी पाच दहा रुपये मागतात.भीक मागणे हा एक सध्या व्यवसाय बनला आहे. त्याचे अगदी पद्धतशीर नियोजन केले जाते. स्थानिक भिकारी असतातच पण आता सांगली कोल्हापूर, मिरज कोल्हापूर असे अपडाऊन करणारे भिकारी कोल्हापुरात ठीक ठिकाणी दिसतात. मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी, सांगली मिरज येथून काही हौदा टेम्पोतून 100 पेक्षा अधिक संख्येनेभिकारी स्त्री-पुरुष ताराराणी चौकात उतरतात. तेथून ते त्यांना दिलेल्या गर्दीच्या मंदिर परिसरात जातात. प्रत्येकाला शहरातील मंदिरे वाटून दिलेली असतात.

दिवसभर मंदिराच्या परिसरात थांबून ही सर्व भिकारी मंडळी सायंकाळी ताराराणी चौकात पोहोचतात आणि तेथून ते त्यांच्यासाठी असलेल्या टेम्पो मधून सांगली मिरजेला जातात. रोख स्वरूपात मिळालेल्या भिकेचा हिशोब या भिकाऱ्यांना संबंधिताला द्यावा लागतो. त्याची त्याला टक्केवारी द्यावी लागते.काही स्त्रिया भीक मागण्यासाठी सोपे जाते म्हणून दीड ते तीन वर्षे वयापर्यंतचे बाळ भाडेतत्त्वावर घेतात. या बाळाला सतत रडवत ठेवणे हे त्यांना भिकेसाठी आवश्यक असते. कोल्हापुरातील एका सिग्नल वर एक महिला भिकारी कडेवर रडणारे बाळ घेऊन भीक मागत होती. (economic)तिथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला त्या रडणाऱ्या बाळाचा संशय आला. रडणारे बाळ हे त्या स्त्रीचे नाही याची खात्री पटल्यानंतर त्याने सरळ पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. महिला पोलिसांने त्या बाळाची स्थिती पाहिली तेव्हा त्याच्या अंगावर हाताने चिमटे काढलेल्या छोट्या छोट्या जखमा दिसल्या. ही भिकारी महिला त्या बाळाला चिमटे काढून रडवत होती हे स्पष्ट झाल्यानंतर महिला पोलिसांनी तिला फैलावर घेतले असता हे बाळ मी मिरज येथून भाडे तत्त्वावर घेतले असल्याचे त्यांनी कबूल केले.

शाहूपुरी पोलिसांनी या महिलेला अटक केली.दारो दारी जाऊन, दुकानासमोर थांबून एखादी तरुण महिला भिकारी भीक मागत असेल आणि तिच्याकडे वर रडणारे बाळ असेल तर ते तिचेच आहे हे सांगता येणार नाही अंजनाबाई गावित, सीमा गावित, रेणुका शिंदे यांची नावे महाराष्ट्राला माहीत नाहीत असे नाही. कारण या तिघीजणी भीक मागताना सोपे जावे म्हणून छोट्या छोट्या बालकांचे अपहरण करत असत. पळवून आणलेली मुले ही आजारी पडायला लागली की त्यांना ठार मारायचे असा त्यांच्याकडून क्रुरतेचा सिलसिला अनेक वर्षे सुरू होता. दहापेक्षा अधिक बालक आणि बालीकांना या टोळीने ठार मारले होते. त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली होती आणि आज त्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठालेली आहे.

कोल्हापुरात गुडघ्यापासून खाली पाय नसलेले दहापेक्षा अधिक तरुण आणि मध्यमवयीन भिकारी आहेत. (economic)चार चाके लावलेल्या फळीवरून आणि हा गाडा दोन्ही हाताने पुढे नेत ते भीक मागत असतात. दररोज किमान एक हजार रुपये भिक मिळवल्याशिवाय घरी परतायचे नाही असा निर्धार करूनच ते भल्या सकाळी कुठून कुठून तरी कोल्हापूर शहरात येत असतात. दरमहा किमान 30 हजार रुपये या अपंग भिकाऱ्यांची मिळकत असते.सध्या कोल्हापूर सह राज्यात नवरात्र उत्सव सुरू आहे. साडेतीन शक्तीपीठे असलेल्या जिल्ह्यात नवरात्र उत्सवात नवदुर्गा दर्शनाच्या निमित्ताने प्रचंड गर्दी उसळलेली असते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी भिकाऱ्यांची संख्या ही मोठी असते. (economic)सध्या कोल्हापूर शहरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिर, तसेच भाविकांची प्रचंड रहदारी असलेला भाऊसिंगजी रोड येथे महिला आणि पुरुष भिकाऱ्यांची संख्या मोठी दिसते. हे भिकारी बहुतांशी सांगली मिरज, निपाणी, वगैरे भागातून आलेले आहेत.या भिकाऱ्यांचा भाविकांना भलताच त्रास होत असतो.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं