कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
येत्या डिसेंबर महिन्यांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम उडणार आहे.(backdrop) याच महिन्याच्या सुरुवातीपासून राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सक्रिय होतील. जागा वाटपाचा सिलसिला सुरू होईल. ज्यांची उमेदवारी निश्चित आहे किंवा जे कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवणार आहेत त्यांनी आत्तापासूनच नियोजन केले असून आपल्या प्रभागातील महिला मतदारांसाठी नवदुर्गा दर्शनचे आयोजन हा त्याचाच एक भाग आहे. राज्याच्या विविध भागातून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी रोज उसळत असून त्यामध्ये महिला वर्गाचा टक्का मोठा आहे.

बहुतांशी महिलांचा कोल्हापूर दौरा हा इच्छुक उमेदवारांनी आयोजित केला आहे.मुंबईची मुंबादेवी, नाशिकची सप्तशृंगी, सोलापूरची तुळजाभवानी, अमरावतीची एकवीरा देवी,पुण्याची चतुर्श्रुंगी, साताऱ्याची काळुबाई, माहूरगडची रेणुका देवी, कोल्हापूरची अंबाबाई,मुंबई जवळची वज्रेश्वरी अशा या महाराष्ट्रातील नवदुर्गा आहेत. या सर्व ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त गेल्या काही दिवसांपासून भाविकांची गर्दी उसळली आहे.(backdrop) कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असल्यामुळे दररोज किमान एक ते दीड लाख भाविक तिच्या दर्शनासाठी येत असतात.
करवीर निवासिनी अंबाबाई ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर आणि देशाबाहेरही प्रसिद्ध आहे. स्थानिक भाविक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक यांच्या गर्दीमुळे अंबाबाई मंदिर परिसर, भाऊसिंगजी रोड, महाद्वारा रोड, राजाराम रोड, शिवाजी रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी हा परिसर गर्दीने फुलून गेलेला आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवाचा निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी अधोरेखित करण्यासाठी चांगला उपयोग करून घेतला आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील महिलांचे नवदुर्गा दर्शन दौरे सुरू केले आहेत.

टेम्पो ट्रॅव्हल्स, क्रुझर, मिनी बसेस, स्कार्पिओ अशा विविध वाहनांचा वापर नवदुर्गा दर्शनासाठी केला जात असल्याचे चित्र कोल्हापुरात दिसते आहे.या व अशा प्रकारच्या वाहनांवर इच्छुक उमेदवारांची नावे ठळकपणे दिसतात.कोल्हापुरातील महिलांना सुद्धा इथल्या बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांच्या कडून परगावच्या नवदुर्गांच्या दर्शनासाठी अशा प्रकारच्या धार्मिक सहली आयोजित केलेल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत महिला सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत.(backdrop) त्यांनीही अशा प्रकारचे नवदुर्गा दर्शन आयोजित केले आहे. निवडणुकीतील प्रचाराचा एक भाग आहे असे समजून इच्छुकांच्याकडून यंदाच्या नवरात्र उत्सवात नवदुर्गा दर्शनाचे आयोजन केलेले आहे.सुरुवातीला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. कारण जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांच्या खर्चाला नवरात्र उत्सवापासूनच सुरुवात झालेली आहे असे म्हणावे लागेल.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं