गुजरातमधील वडोदरा येथे गरब्याच्या कार्यक्रमातील एका जोडप्याचा (Garba)वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे. हे जोडपं पारंपारिक वेशात गरबा खेळण्यासाठी आलेलं असतानाच मैदानात त्यांनी स्टंटबाजी केल्याचं दिसून आलं. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकी गेली असून या जोडप्यानं अश्लील चाळे केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओत दिसणारं जोडपं हे भारतीय वंशाचे प्रतीक पटेल आणि त्यांची पत्नी आहे. या दोघांनीही त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागितली आहे. (Garba)नवरात्रोत्सवादरम्यान कलाली परिसरातील युनायटेड वे गरबा येथे हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात राहणारे आणि कुटुंबाला भेटण्यासाठी आणि उत्सवांचा आनंद घेण्यासाठी भारतात आलेले हे जोडपे सध्या टीकेचे धनी ठरत आहे.

गरबा कार्यक्रमात मैदानातच पारंपारिक वेशात एकमेकांचं चुंबन घेत असलेल्या जोडप्याच्या व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. धार्मिक कारणांचा हवाला देत या दोघांवर टीका केली जात आहे. सनातन संत समितीने जोडप्याच्या कृतीकडे लक्ष वेधत दोघांवर कारवाईची मागणी केली आहे. (Garba)धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली जोडप्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अधिवक्ता भाविन व्यास यांनी अटलदरा पोलिस ठाण्यात संपर्क साधला आहे.

पोलीस ठाण्यात बोलावल्यानंतर, पटेल आणि त्यांच्या पत्नीने लेखी माफीनामा सादर केला. या माफीनाम्यात त्यांनी, ‘नवरात्रीदरम्यान पवित्र स्थळीट केलेल्या कृती अयोग्य होत्या,'(Garba) असं मान्य केलं आहे. ‘लाइव्हमिंट’ने एका पोलीस निरीक्षकाच्या हवाल्याने सांगितले की, या जोडप्याचे लग्न 16 वर्षांपूर्वी झाले आहे. या दोघांना दोन मुले आहेत.हे जोडपे मूळचे मांजलपूर आणि आणंद येथील आहेत परंतु ते ऑस्ट्रेलियात राहत आहेत. वृत्तानुसार, वादानंतर हे जोडपे भारत सोडून ऑस्ट्रेलियात परतले. या व्हिडीओवरुन दोन गट पडल्याचं दिसत असले तरी टीका करणाऱ्यांची संख्या तुलनेनं अधिक आहे.

हेही वाचा :

SUV खरेदी करायचीये का? 

आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार,

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;