घरात अनेकजण विशेष: महिला जर कशाला सर्वात जास्त घाबरत असतील तर ती पाल आहे. (woman)कधी किचनमध्ये, कधी बाथरुममध्ये दिसणारी पाल पाहिल्यानंतर अनेकांना प्रचंड घाबरायला होतं. कारण ती अंगावर पडण्याची भीती असते. किंवा किचनमध्ये कधी कधी जेवण झाकलेलं नसतं तेव्हा त्यात पडण्याची भीती असते. त्यामुळे पाल घरात दिसली की सगळेजण तिला हाकलवून लावतात.पण काहीवेळेला पालीचे चूकचूक आवाज करणे किंवा तिचे अंगावर पडणे यावरून अनेक शुभ किंवा अशुभ शकुनांसोबत संबंध जोडले जातात. ज्योतिष आणि शकुनशास्त्रात, पाल पडण्याची घटना सामान्य मानली जात नाही. उलट, ती भविष्यातील शुभ किंवा अशुभ शकुनांशी जोडली जाते.

विशेषतः जर एखाद्या महिलेच्या शरीराच्या काही भागांवर पाल पडली तर त्याचे अनेक अर्थ निघतात. काही ठिकाणी ते संपत्ती आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, तर काही ठिकाणी त्याकडे अशुभ चिन्ह म्हणून पाहिले जाते. (woman)चला जाणून घेऊया की स्त्रीच्या शरीरावरील कोणत्या भागांवर पाल पडणे शुभ किंवा अशुभ मानले जाते.शकुन शास्त्रानुसार, जर एखाद्या महिलेच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पाल पडली तर तो एक शुभ शकून मानले जाते. असे मानले जाते की भविष्यात महिलेला आर्थिक लाभ होण्याची आणि नातेसंबंधांमधील संघर्ष दूर होण्याचे संकेत आहेत.

एखाद्या महिलेच्या थेट डोक्यावर पाल पडणे अशुभ मानले जाते. (woman) याचा अर्थ असा की तिला भविष्यात काही वाईट बातमी मिळू शकते. शिवाय, जर एखाद्या महिलेच्या डाव्या हातावर पाल पडली तर याचा अर्थ असा होतो की तिला अनावश्यक खर्च येऊ शकतो किंवा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. स्त्रीच्या उजव्या हातावर पाल पडणे शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभाची आणि तसेच नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता दर्शवते.

पाल महिलेच्या उजव्या पायावर पडणे शुभ मानले जाते. (woman)याचा अर्थ असा की ती भविष्यात प्रवास करू शकते आणि कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. महिलेच्या डाव्या पायावर पाल पडणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की जर तुम्ही कुठे जाण्याचे नियोजन करत असाल पिकनीकचे नियोजन करत असाल तर ते पुढे ढकलावे कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

महिलेच्या गळ्यावर पाल पडणे
एखाद्या महिलेच्या गळ्यावर पाल पडणे हे कुटुंबातील शुभ घटना आणि समृद्धीचे संकेत देते.

महिलेच्या पोटावर पाल पडणे
महिलेच्या पाठीवर पाल पडणे हे अशुभ लक्षण मानले जाते. (woman)याचा अर्थ जवळच्या व्यक्तीशी मतभेद किंवा वाद होऊ शकतात. हे वाद कुटुंबात, परिसरात किंवा कामाच्या ठिकाणी होऊ शकतात, म्हणून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवावा लागेल. महिलेच्या पोटावर पाल पडणे हे देखील अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ भविष्यात तिला पोटाशी संबंधित समस्या येऊ शकतात.

हेही वाचा :

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…