दिवाळीनिमित्त घरात वेगवेगळ्या पदार्थांपासून लाडू बनवले (Ladoo)जातात. पण आज आम्ही तुम्हाला साखरेचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये ओट्स लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. याशिवाय दिवाळीमध्ये साफसफाई करून फराळ(Ladoo) बनवला जातो. फराळातील सर्वच पदार्थ बनवताना सारखेच वापर केला जातो. पण अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोड पदार्थ खाल्ले जातात. यामुळे मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवाळीला सणाला साखरेचा वापर न करता ओट्सचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ओट्स आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असतात. ओट्सचे सेवन केल्यामुळे पोटसुद्धा भरलेले राहते आणि शरीरात अतिरिक्त साखरेचे प्रमाण अजिबात वाढत नाही. दिवाळीमध्ये फराळातील पदार्थ बनवताना कमीत कमी साखरेचा वापर करून पदार्थ बनवावे. चला तर जाणून घेऊया साखरेचा वापर न करता लाडू बनवण्याची सोपी कृती.

साहित्य:

ओट्स
खजूर
बदाम
काजू
वेलची पावडर
अळशीच्या बिया
चिया सीड्स
तूप

कृती:

साखरेचा वापर न करता लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात ओट्स टाकून मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजा. ओट्स जास्त भाजू नये.
मिक्सरच्या भांड्यात बिया काढून घेतलेले खजूर घेऊन बारीक पेस्ट तयार करा.
कढईमध्ये तूप टाकून त्यात सर्व सुका मेवा भाजून घ्या. त्यानंतर त्यात अळशीच्या बिया आणि चिया सीड्ससुद्धा टाका.
पुन्हा एकदा कढईमध्ये तूप टाकून त्यात खजुराची पेस्ट घालून भाजा आणि भाजून घेतलेले इतर सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून मिक्स करा. लाडू बनवण्याआधी हाताला तूप लावून तुम्हाला हवे त्या आकारात लाडू बनवून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी आणि टेस्टी लाडू. हा पदार्थ कोणत्याही आजाराचे रुग्ण खाऊ शकतात.

हेही वाचा :

नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर….Video Viral
महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का
नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार