दिल्लीच्या गांधी विहार परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यूपीएससीची तयारी करणाऱ्या रामकेश मीणा (वय ३२) या विद्यार्थ्याची त्याच्या लिव्ह-इन पार्टनर अमृता चौहान (वय २१) हिने आपल्या एक्स बॉयफ्रेंड संदीप कुमार आणि एका साथीदारासह मिळून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी खोलीला आग लावून दिली.ही घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली. गांधी विहारमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवताना दलाच्या जवानांना एक जळालेला मृतदेह आढळला. सुरुवातीला हा प्रकार अपघाती असल्याचं वाटलं; मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज(private) आणि मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर या प्रकरणात खुनाचा थरारक तपशील समोर आला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण आणि एक तरुणी रात्रीच्या वेळेस इमारतीत प्रवेश करताना दिसले आणि काही वेळानंतर बाहेर पडतानाही आढळले. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत अमृताने गुन्ह्याची कबुली दिली.अमृताने सांगितले की, रामकेशकडे तिचे काही खासगी(private) फोटो आणि व्हिडिओ होते, जे तो डिलीट करण्यास नकार देत होता. त्यामुळे तिने आपला एक्स बॉयफ्रेंड संदीप आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने रामकेशचा खून करण्याचा कट रचला.

६ ऑक्टोबरच्या रात्री तिघेही गांधी विहारमधील फ्लॅटमध्ये गेले. तिथे त्यांनी रामकेशचा गळा दाबून त्याला ठार मारले, त्यानंतर त्याच्या अंगावर तेल ओतून गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून आणला. नंतर तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांनी आरोपींकडून काही महत्त्वाचे पुरावे आणि साहित्य जप्त केले आहेत. सध्या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू असून, या खुनामागील इतर कोणते कारण होते का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे दिल्लीतील अभ्यासक वर्गात आणि स्थानिक परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट भेटला नाही म्हणून चक्क टीव्ही लावली डोक्यावर… Video Viral
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टची बेकायदेशीर विक्री रद्द करा — दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईची सकल जैन समाजाची मागणी
”तू जिथे भेटशील तिथे चप्पलने मारेन टकल्या”, ‘या’ दिग्दर्शकावर भडकली राखी सावंत…