वडिल आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.(daughter) एका पित्याने सहा वर्षाच्या मुलीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्यंत विचित्र पद्धतीने हे सर्व प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहेय या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये सावत्र बापाकडून लेकीचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या भगूर येथे ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी नुसार देवळाली कॅम्प पोलिस ठाणे येथे नराधम सावत्र बापा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बब्बू रावत असे या नराधमाचे नाव असून देवळाली कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

26 नोव्हेंबर 2025 रोजी हा प्रकार घडला आहे. (daughter) सुकापूर पेठ ,भगूर येथे संशयित राहुल रावत हा त्याची पत्नी आणि सहा वर्षाच्या सावत्र मुलीसोबत राहत होता. संशयित राहुल हा मोलमजुरीचे काम करतो. त्याने त्याच्या सहा वर्षाच्या सावत्र मुलीला राहत्या घरी आधी तिच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेऊन तिला जबरदस्तीने दारू पाजली त्यानंतर त्याने तिच्या शरीराला जबरदस्ती करून घाणेरड्या पद्धतीने हात लावत तिचा लैंगिक छळ केला. घरात पत्नी नसताना त्याने हे कृत्य केले.

त्याची पत्नी घरी आल्यावर मुलीची अवस्था पाहून तिला संशय आला.(daughter) यानंतर मुलीशी बोलल्यावर हा सर्व प्रकार आईच्या लक्षात आवा. हे सर्व प्रकरण लक्षात येताच पीडित मुलीच्या आईने देवळाली कॅम्प पोलिस ठाणे गाठून संशयित नराधम बाप याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारी नुसार देवळाली कॅम्प पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ संशयित राहुल रावत याला बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार

एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral

हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!