एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका इसामाने 65 वर्षीय (body)महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने जे काही केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 16 नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळ जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका महिलेचा मृतदेह सापडला. कपडे फाटलेले होते, अवस्था पाहून स्पष्ट झालं की हत्येनंतर आरोपीने अत्यंत अमानुष कृत्य केलं आहे.

24 वर्षीय सलमान हा तरुण याआधीच अल्पवयीन मुलीच्या (body)अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी होता. त्याच प्रकरणी 16 नोव्हेंबरला दिल्ली कोर्टात त्याला हजर करण्यात आले होते. त्यासाठी तो 15 नोव्हेंबरच्या सायंकाळी दिल्लीत आला. दारू विकत घेतली, खूप प्यायला आणि नशेत फिरत असताना त्याला ही 65 वर्षीय महिला एकटी दिसली. सलमानजवळ नारळ फोडण्याचे हत्यार होते. त्याने महिलेला ओढत नेताच तिने जोरदार विरोध केला. याच रागात त्याने तिच्या डोक्यावर 2-3 वार केले. महिला तिथेच कोसळली. त्यानंतर त्याने तिला ओढत झुडपांमध्ये नेले आणि हत्येनंतर मृतदेहासोबतही अमानुष कृत्य केले. त्याने मृत महिलेवर बलात्कार केला.

तपासात समजलं की, ही महिला होलंबी कलान येथे राहायची.(body) पतीपासून वेगळी राहून ती आजादपूर मंडी परिसरात मजुरी करायची आणि रात्री स्टेशनजवळच झोपायची. 15 नोव्हेंबरच्या रात्रीही ती मंडीहून स्टेशनकडे चालली होती, तेव्हाच हा भयंकर प्रकार घडला. पोलिसांना दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज पाहिजे. त्यात एक तरुण चप्पल घालून जाताना दिसला, पण परतताना तो अनवाणी होता. ही बाब पोलिसांच्या संशयाला बळ देऊन गेली. परिसरात चौकशी केली असता काहींनी त्या तरुणाला ओळखले. पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो गुजरातच्या भरूचचा असल्याचे समजले. जुन्या रेकॉर्ड तपासले असता सलमानचे नाव समोर आले. अटक केल्यानंतर सलमानने पूर्ण गुन्हा कबूल केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हेही वाचा :
‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार
एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral
हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!