कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.(candidates) महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपांचा सिलसिला सुरु झालेला नाही.फार्म्युला निश्चित झालेला नाही. पण तरीही पक्षीय उमेदवारी मिळाली आहे अशा स्वयंघोषितांनी आपली उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर मतदारांना भोजनावली सुद्धा सुरू झालेल्या आहेत. कोल्हापूर महापालिकेच्याएकूण 20 प्रभागांमध्ये 81 जागा आहेत. प्रत्येक प्रभाग चार सदस्यांचा आहे. महायुतीकडून अधिकृतपणे जागा वाटप झालेले नाही. तथापि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांना प्रत्येकी 31 आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा असे जागावाटपण निश्चित करण्यात आले

असल्याचे समजते. या शिवाय कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे (candidates) आमदार अमल महाडिक आणि कोल्हापूर उत्तर चे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर या दोघांना प्रत्येक प्रभागात प्रत्येकी दोन जागा दिल्या जाणार आहेत. महा विकास आघाडीत “आनंदी आनंद” आहे. सब कुछ सतेज पाटील असे वातावरण आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महाविकास आघाडीचे घटक पक्ष नेते म्हणून इथे फारसा वाव नाही. त्यामुळे सर्वाधिक जागा सतेज पाटील यांना अर्थात काँग्रेस पक्षाला मिळणार आहेत हे वास्तव आहे. सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयातून उमेदवारांच्या नावाचे निश्चितीकरण सुरू आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या गेल्यास सभागृहात सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक सतीश पाटील (candidates) यांच्या काँग्रेसचे होते. त्यापैकी काही महत्त्वाचे माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत.शहराच्या उप नगरीय भागातून पुरुष आणि महिला उमेदवारांनी आम्हाला पक्षाचे तिकीट मिळालेलं आहे असे ठाम गृहीत धरून पक्षाच्या चिन्हासह निवेदने घरोघरी देण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग मोठा असल्याने निवेदने वाटण्यासाठी रोजंदारीवर रोज सहाशे रुपये पुरुष आणि महिलांना कामास जुंपले आहे.घरोघरी येणाऱ्या वृत्तपत्राच्या पानांमध्ये निवेदने घालून ती घरपोच मिळावीत अशी व्यवस्था काही उमेदवारांनी केली आहे.

ज्यांची पक्षीय उमेदवारी निश्चित समजली जाते अशा उमेदवारांनी गल्ली निहाय(candidates) भोजनावळी सुरू केल्या आहेत. काही उपनगरांमध्ये तसेच शहराच्या बाहेर असलेली फार्म हाऊस संगीत पार्ट्यांसाठी वापरली जाऊ लागली आहेत. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी” 31 डिसेंबर”जोरात होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या उमेदवारांनीच आयोजित केलेल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला इच्छुक उमेदवार केक घेऊन हजेरी लावू लागले आहेत.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट