कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी किंवा बिबट्याने (food)लोकवस्तीच्या आसपास येऊ नये म्हणून त्यांचे खाद्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केला आहे. हा निर्णय म्हणजे गंभीर दुखण्यावर मलमपट्टी करण्यासारखा आहे शिवाय जंगलातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमालीच्या पातळीवर घटल्याने अन्नसाखळी तुटली आहे हे त्यांनी अप्रत्यक्ष कबूल केल्यासारखे आहे. म्हणजेच वनविभागाचे हे सपशेल अपयश आहे असे म्हणावे लागेल.अन्नाच्या शोधात बिबटे हे मोठ्या संख्येने लोकवस्तीच्या आसपास दिसू लागले आहेत. या बिबट्यांनी माणसांवर हल्ले सुरू केले आहेत. गेल्या चार महिन्यात 53 लोकांचे बळी गेले आहेत.

एकूणच कधी नव्हे इतका बिबट्यांनी उच्छाद मांडलेला आहे.(food) बिबट्यांची वाढलेली संख्या आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेले अन्न याचे प्रमाण व्यस्त झाले आहे. म्हणजे त्यांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना त्यांचे नैसर्गिक अन्न उपलब्ध होत नाही.
ग्रामीण भाग ओलांडून आता हे बिबटे शहरी भागात घुसले आहेत. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात त्यांचा मुक्त संचार चालू झाला आहे.त्यामुळेच गांभीर्य कितीतरी पटीने वाढलेले आहे. अन्नसाखळी तुटल्याचा हा दृश्य परिणाम आहे.वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांचा माणसाला होणारा त्रास कमी होण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत.त्यापैकीच एक उपाय योजना म्हणजे जंगलामध्ये एक कोटी रुपये किमतीच्या शेळ्या सोडल्या जाणार आहेत. या शेळ्या म्हणजे बिबट्यांचे खाद्य असले तरी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार कशा हा प्रश्न आहे.
बिबट्याने त्यांचा खोल अरण्यातील, जंगलातील अधिवास केव्हाच सोडला आहे.(food) कारण त्याच्या नैसर्गिक अधिवासात तृणभक्षी प्राणी कमी झाले आहेत. किंवा यात तृणभक्षी प्राण्यांची शिकार माणसाने केली आहे. म्हणून मग काही वर्षांपूर्वी बिबट्याने अधिवास सोडला आहे आणि आता तो उसाच्या उभ्या पिकात बिनधास्त राहताना दिसतो आहे.वन विभागाकडून शेळ्या या थेट जंगलात सोडल्या जाणार आहेत आणि बिबटे हे उसाच्या फडात, खुरट्या झाडीमध्ये आहेत. अर्थातच त्याचे खाद्य म्हणून सोडल्या जाणाऱ्या शेळ्या ह्या त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. तर मग या उपाययोजनेचा फायदा काय?सुमारे एक कोटी रुपयांच्या शेळ्या धनगरांच्या कडून खरेदी केल्या जाणार आहेत. पाच हजार रुपयांना एक शेळी मिळत असेल तर एक कोटी रुपयांमध्ये दोन ते अडीच हजार शेळ्या उपलब्ध होतील.
त्यांना जंगलामध्ये सोडले जाईल. या शेळ्या माणसाचे खाद्य होणार नाहीत कशावरून?(food) कोणत्याही शस्त्रांचा वापर न करता सहज खाद्य म्हणून शेळी मिळत असेल तर त्याची माणसाकडून चोरी होणारच नाही असे म्हणता येणार नाही.एक तातडीची उपाययोजना म्हणूनवनमंत्र्यांच्या या निर्णयाकडे पाहता येईल. पण ही उपाययोजना भरवशाची आहे असे म्हणता येणार नाही. बिबटे लोकवस्तीच्या आसपास आणि शेळ्या जंगलात म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशातला प्रकार म्हणावा लागेल.बिबट्या हा वन्यजीव कायदा 1972 च्या अन्वये शेड्युल एक मध्ये येतो. त्याला शेड्युल दोन मध्ये आणले गेले तर त्याचे रेस्क्यू ऑपरेशन करण्याचे अधिकार राज्य शासनाला प्राप्त होतील. पण हे सहज शक्य नाही. मादी बिबट्यांची नसबंदी करणे हा एक प्रभावी उपाय आहे. कारण त्यामुळे बिबट्यांची पैदास कमी होईल. बिबट्यांनी पुन्हा त्यांच्या जंगलातील अधिवासात जावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आणि त्यासाठी तृणभक्षी प्राण्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होईल (food)असे वातावरण निर्माण केले गेले पाहिजे. त्यासाठी तृणपक्षी प्राण्यांचे खाद्य तयार करावे लागेल. विशिष्ट प्रकारचे ग्रास किंवा वनस्पती यांची उपलब्धी करून दिली पाहिजे.ज्या देशांमध्ये बिबट्या नाहीत त्या देशांना बिबट्यांची निर्यात करणे योग्य होईल. बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर अनेक ठिकाणी उभे केले पाहिजेत. केवळ वनतारा वर अवलंबून राहता कामा नये.रेस्क्यू ऑपरेशन करून किंवा नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याला डर्ट मारून, बेशुद्ध करून पकडून त्याला अधिवासात सोडले पाहिजे.अशा काही उपाययोजना राबवले पाहिजेत, त्यात सातत्य ठेवले पाहिजे, आणि तरच मग बिबट्यांचा माणसाला होणारा त्रास कमी होईल. एक कोटीच्या शेळ्या जंगलात सोडणे हा काही प्रभावी उपाय नाही.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट