कोल्हापूरमध्ये घरात कोणीही नसल्याची संधी साधून तरुणांनी डल्ला मारला.(place)याप्रकरणी इचलकरंजी परिसरातील शहापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांकडून तब्बल ५३ लाख ७३ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक घरफोडींमध्ये सहभागी असलेल्या या चोरट्यांकडून ४३ तोळे ७०० मिली वजनाचे दागिने हस्तगत झाले आहेत.कोल्हापूरमधील तारदाळ परिसरातील एका घरफोडी प्रकरणानंतर शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फिर्यादी महिला घराला कुलूप लावून आईकडे गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून ५ लाख ७६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.

या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, (place)अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार आणि उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.तपासादरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम चोरी केलेलं सोनं विक्रीसाठी यड्राव भागात येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून प्रल्हाद विठ्ठल कवठेकर आणि उदय श्रीकांत माने या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

अंगझडतीत सोन्याचे दागिने मिळताच आरोपींनी तारदाळमधील (place)घरफोडीसह शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण हददीतील घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली.पोलिसांनी दोघांकडून एकूण ४३ तोळे ७०० मिली सोनं, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला. मुद्देमालाची एकूण किंमत ५३ लाख ७४ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट