कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

महाविकास आघाडीमध्येउद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (parties)आणि राष्ट्रीय काँग्रेस असे तीन प्रमुख घटक पक्ष आहेत.कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे सतेज पाटील यांनी दोन्ही घटक पक्षांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे या पक्षांचे स्थानिक नेते कमालीचे नाराज झालेले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अर्थात मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बऱ्यापैकी एकमत आहे पण महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे आणि गोंधळाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी एकत्र येऊन या निवडणुकांच्या संदर्भात फारसा विचार केलेला नाही किंवा तशा बैठकाही झालेल्या नाहीत. या नेत्यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांना नेमक्या सूचना किंवा मार्गदर्शनही केलेले नाही.

कोल्हापूर महापालिकेवर गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. (parties) गेल्या विसर्जित सभागृहात काँग्रेसचे 30 नगरसेवक होते. काँग्रेसचे सतेज पाटील यांची या महापालिकेवर हुकुमत होती.याही निवडणुकीत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता येईल किंवा सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असतील यासाठी आमदार सतेज पाटील यांनी प्रयत्न चालवले आहेत आणि हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी रणनीती आखली आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना फारसे जवळ करायचे नाही असे ठरवलेले दिसते. कारण कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवताना सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलेले नाही किंवा त्यांच्याबरोबर प्राथमिक स्वरूपाची सुद्धा बोलणी केलेली नाहीत.

माजी महापौर आर. के. पोवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत. (parties) सध्या शरद पवार गटाचे आहेत. त्यांचे पुतणे रमेश पोवारहे यापूर्वी कोल्हापूर महापालिकेवर राष्ट्रवादी अखंड काँग्रेसचे नगरसेवक होते. ते या निवडणुकीतप्रभाग क्रमांक 12 मधून उतरणार आहेत. पण त्यापूर्वीच सतेज पाटील यांनी ईश्वर परमार, नियाज सुभेदार, मुळीक आणिरहीम बागवान या चौघांची नावे निश्चित केली आहेत. आणि त्यामध्ये घटक पक्षाचे कोणीही नाहीत. प्रभाग क्रमांक 12 मधील चार सदस्यांची नावे निश्चित झाली असल्याचे करतात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आर के पोवार हे चांगलेच संतप्त झाले आहेत. स्थानिक पातळीवर मला विश्वासात न घेता प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार ठरवलेच कसे असा त्यांचा सतेज पाटील यांना सवाल आहे.

त्यांचे पुतणे रमेश पोवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला आहे. (parties)मुळातच कोल्हापूर शहरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फारसे स्थान उरलेले नाही . स्थानिक नेत्यांनी सुद्धा उरलेल्या पक्षासाठी फारसे काही काम केलेले दिसत नाही. ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक शिवसैनिक बाहेर पडू लागले आहेत.महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील घटक पक्षांचेसर्वसामान्य जनतेत स्थान काय आहे हे ओळखलेल्या काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी वीस प्रभागांमध्ये सर्वाधिक उमेदवार काँग्रेस पक्षाचेच देण्याचे ठरवलेले दिसते आणि त्या दिशेने त्यांची सध्या वाटचाल सुरू आहे.

महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे इच्छुक उमेदवारांचा सर्वाधिक ओढा आहे (parties)तर महाविकास आघाडी मधील राष्ट्रीय काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांचा ओढा आहे.महायुतीमध्ये आपले काही चालणार नाही किंवा आपणाला उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येणारे इच्छुक पर्याय म्हणूनराष्ट्रीय काँग्रेस कडे जात आहेत. सध्या महापालिका निवडणुकीच्या हालचालीचे प्रमुख केंद्र ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा हे बनले आहे. या कार्यालयात पाटील हे ठिय्या मारून आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना बाजूला ठेवून पाटील हे महापालिकेच्या निवडणुकीचे राजकारण खेळताना दिसतात.

हेही वाचा :

शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!

सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान

१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट