कॅन्सर हा एक असा गंभीर आजार आहे जो आपल्या शरीरात शांतपणे वाढत राहतो.(cancer)जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा आजार आधीच पसरलेला असतो ज्यामुळे उपचार करणं कठीण होतं. काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलं की. कोलोरेक्टल आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरचं लवकर निदान केल्यास सरासरी आयुष्य काही महिन्यांनी वाढते आणि स्थानिक अवस्थेत ट्यूमर सापडल्यास बरं होण्याची शक्यता खूप वाढते.पेशींमधील बदल, रक्तातील असामान्य DNA किंवा संपूर्ण शरीराच्या इमेजिंग सिग्नल्स शोधून गाठ तयार होण्यापूर्वीच किंवा ती वाढण्यापूर्वीच ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी डॉक्टरांनी कॅन्सर अगोदरच शोधणाऱ्या टेस्टबाबत माहिती दिलीये.

स्क्रीनिंग टेस्ट
कॅन्सर तपासणीची साधने म्हणजे, स्तनासाठी मॅमोग्रॅम,(cancer) गर्भाशयासाठी पॅप आणि HPV चाचणी, कोलोरेक्टलसाठी कोलोनोस्कोपी किंवा मल तपासणी, धूम्रपान करणाऱ्यांसाठी लो-डोस CT स्कॅन आणि प्रोस्टेटसाठी PSA चाचणी.

या चाचण्या लक्षणं नसलेल्या लोकांवर केंद्रित असतात आणि लवकर टप्प्यातील कॅन्सर किंवा पेशींमधील बदल शोधतात, जे काढून टाकल्यास कॅन्सर होण्यापासून रोखता येतं. अभ्यासात दिसून आलंय की कोलोरेक्टल आणि फुफ्फुस तपासणी आयुष्य वाढवतं म्हणजे लवकर निदान होण्यास मदत होते.

गॅलेरी टेस्ट
गॅलेरी ही मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन रक्त चाचणी आहे. जी कॅन्सर पेशींनी रक्तप्रवाहात सोडलेल्या सेल-फ्री DNA मधील असामान्य नमुने शोधते. PATHFINDER 2 सारख्या मोठ्या अभ्यासांमध्ये, गॅलेरीला नियमित तपासणीसोबत जोडल्यास एका वर्षात आढळलेल्या कॅन्सरची संख्या सातपट वाढली. त्यापैकी तीन-चतुर्थांश कॅन्सर असे होते ज्यांसाठी सध्या कोणतीही नियमित तपासणी शिफारस केलेली नाही.

जीन तपासणी
जीन टेस्टमध्ये BRCA1/2, TP53 आणि इतर कॅन्सर जीनमधील वारसाहक्काने आलेले बदल शोधले जातात. जे स्तन, अंडाशय, कोलोरेक्टल आणि इतर अनेक कॅन्सरचा आयुष्यभराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात. इमेजिंग किंवा रक्त तपासणीपेक्षा ही चाचणी आयुष्यात एकदा किंवा काही वेळाच केली जाते आणि पेशी पूर्वकॅन्सर होण्यापूर्वीच धोका दर्शवतात.

संपूर्ण शरीराचा MRI
WB‑MRI ही इमेजिंग चाचणी आहे जी डोक्यापासून अनेकदा हात-पायांसह, (cancer)किरणोत्सर्गाशिवाय स्कॅन करते आणि एका सेशनमध्ये शरीरातील कुठेही ट्यूमर शोधण्यास मदत होते. अभ्यासांमध्ये WB‑MRI ने अनेकदा लक्षणं नसलेले पण महत्त्वाचे कॅन्सर शोधले आहेत. ज्यामुळे निदान होऊन उपचार होण्यास मदत होते.

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग