कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापूर पोलिसांकडून आज महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये भीती अथवा गैरसमज पसरवणारे मेसेज आणि पोस्ट्स सध्या सोशल मीडियावर विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, यासारख्या सोशल मीडियावर अपप्रचार, अफवांद्वारे सामाजिक तणावाचा वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने खोट्या बातम्या, असत्य माहिती, अश्लील किंवा धार्मिक भावना दुखावणारे मॅसेज, फोटो किंवा व्हिडीओ पाठवले जात आहेत.

यासाठी कोल्हापूर पोलिसांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही शंका येताच पोलिस नियंत्रण कक्षाशी किंवा सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे. अफवा, गैरसमज वा आपत्तीजनक मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका किंवा त्यावर विश्वास ठेवू नका. अजूनही काही नागरिकांनी खोटी माहिती कुठेही शेयर केल्यास अथवा अशा गटांचा प्रसार केल्यास त्यांच्यावर गंभीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पुरवण्यात आला आहे.
कोल्हापूर पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्यात येत असून शंका अथवा अडचण असल्यास खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे :
पोलिस नियंत्रण कक्ष कोल्हापूर : 0231 2662333
सायबर क्राईम पो.स्टे. : 8412841100
नागरिकांनो, अफवांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या सुरक्षेसाठी सजग राहा. सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी सत्यतेची खात्री करूनच पुढे पाठवा, असे आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे.