वडील बिझनेसमन, आई टीचर, ‘या’ अभिनेत्रीनं सलमान खानच्या सल्ल्यानं बदललेलं आपलं नाव; आज बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

बारावीत असताना या अभिनेत्रीनं अभिनेत्री (Actress)होण्याचं स्वप्न पाहिलेलं, त्यापूर्वी ही अभिनेत्री तिच्या आईच्या शाळेत मुलांना शिकवायची. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री जिनं आपल्या सौंदर्यानं सर्वांनाच भूरळ घातलीय. तिच्या अभिनयानं तिनं अल्पावधीतच साऱ्यांची मनंही जिंकली. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी अशी एक अभिनेत्री जिचे वडील एक व्यावसायिक आहेत, तर आई शिक्षिका आहे. पण, या अभिनेत्रीनं स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आणि आज तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. बारावीत असताना या अभिनेत्रीनं अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलेलं, त्यापूर्वी ही अभिनेत्री तिच्या आईच्या शाळेत मुलांना शिकवायची.

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलतोय, तिचं नाव कियारा अडवाणी फारच कमी लोकांना माहिती असेल ती, कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया अडवाणी आहे. सलमान खानच्या सल्ल्यानंतर कियारानं तिचं नाव ‘फगली’ सिनेमापूर्वी बदललं. आपल्यासाठी तिनं ‘कियारा’ हे नाव निवडलं, जे प्रियांका चोप्राच्या ‘अंजना अंजनी’ मधल्या पात्रापासून प्रेरित होतं.

कियाराचा जन्म 31 जुलै 1991 रोजी मुंबईत झाला. तिचे वडील जगदीप अडवाणी एक यशस्वी व्यावसायिक आहेत, तर आई जेनेव्हीव्ह जाफरी शिक्षिका आहे. कियाराचे बालपण मुंबईत गेले, जिथे तिने कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर जय हिंद कॉलेजमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. अभ्यासू असलेल्या कियारानं बारावीत 92 टक्के गुण मिळवले. पण, तिचं मन नेहमीच रुपेरी पडद्याकडेच धावत होतं.

आपल्या आकर्षक अभिनयानं आणि साध्या शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या कियारानं अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये एक खास स्थान निर्माण केलं. तिचे वडील एक व्यावसायिक आहेत आणि आई शिक्षिका, पण कियारानं स्वतःच्या बळावर बॉलिवूडच्या जगात प्रवेश केला आणि आज तिचा समावेश टॉप अभिनेत्रींमध्ये होतोय. कियाराच्या मनात पहिल्यांदा अभिनेत्री(Actress) होण्याचा विचार बारावीत असताना आला होता. अभिनेत्री होण्यापूर्वी, कियारा तिच्या आईच्या शाळेत मुलांना शिकवायची.

कियारानं एकदा ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सांगितलं होतं की, जेव्हा ती बारावीत होती, तेव्हा तिनं 2009 मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट पाहिला, ज्यामुळे तिचं आयुष्य बदललं. हा चित्रपट पाहिल्यानंतर तिनं तिच्या वडिलांकडे अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला वडिलांना हे विचित्र वाटलं, पण कियाराची आवड पाहून त्यांनी मुलीला तिच्या स्वप्नांच्या मागे जाण्याची परवानगी दिली. इथूनच कियाराचा बॉलिवूडचा(Bollywood) प्रवास सुरू झाला.

कियारा अडवाणीनं 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. 2016 मध्ये ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली, जिथे तिनं धोनीची पत्नी ‘साक्षी’ची भूमिका साकारली होती. त्यानंतर, 2018 मध्ये, नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ मधील तिच्या धाडसी अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर 2019 मध्ये ‘कबीर सिंह’मधील ‘प्रीती’च्या भूमिकेनं कियाराला रातोरात स्टार बनवलं. या चित्रपटातील तिच्या साध्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.

यानंतर कियारानं ‘गुड न्यूज’, ‘शेरशाह’, ‘भूल भुलैया 2’, ‘जुग जुग जिओ’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय दाखवला. बॉलिवूडसोबतच, कियारा दक्षिण चित्रपटसृष्टीतही हिट ठरली आहे. ‘भारत अने नेनु’ आणि ‘गेम चेंजर’ सारख्या चित्रपटांमधून तिने आपली छाप सोडली आहे. तिचे आगामी चित्रपट ‘वॉर 2’ आणि ‘डॉन 3’ आहेत.

दरम्यान, कियाराचं वैयक्तिक आयुष्यही तिच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच चर्चेत राहिले आहे. 2020 मध्ये, ‘शेरशाह’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, तिची भेट सिद्धार्थ मल्होत्राशी झाली आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. बराच काळ डेटिंग केल्यानंतर, 7 फेब्रुवारी 2023 रोजी, दोघांनी राजस्थानातील जैसलमेर येथे शाही पद्धतीनं लग्न केलं. 15 जुलै 2025 रोजी, कियारानं एका मुलीला जन्म दिला.

हेही वाचा :

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष