पुरुषांना जर सतत लघवीला जाण्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.(frequent)अनेकजण याकडे वयानुसार दिसणारी समस्या म्हणून पाहतात. मात्र असं करणं धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सतत सतत लघवीला होणं हे प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. खासकरून ५० वर्षांच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक होतो.प्रोस्टेट कॅन्सरची सर्वात मोठी समस्या म्हणजे सुरुवातीला याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये हा कॅन्सर शरीरात हळू-हळू पसरत असतो. त्यामुळे थोडी जरी शंका आली तर तपासणी करणं गरजेचं आहे.

सतत लघवीला होणं, थांबून थांबून लघवी होणं, (frequent)लघवी करताना किंवा बंद होताना त्रास होणं किंवा ब्लॅडर पूर्णपणे रिकामी न होणं य गोष्टी लोकं वाढत्या वयामुळे होतात असं मानून मोकळे होतोत. मात्र ही लक्षणं प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. लघवीमध्ये रक्त दिसून येणं हा देखील एक गंभीर संकेत आहे. अशी परिस्थिती आल्यास त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.

प्रोस्टेट वाढण्याची समस्या, युरीन इन्फेक्शन आणि प्रोस्टेट कॅन्सर यांची लक्षणं (frequent) एका सारखीच दिसून येतात. यामध्ये फरक हाच आहे की, इन्फेक्शनमध्ये जळजळ, ताप, किंवा इतर समस्या दिसून येत नाही. मात्र कॅन्सरमध्ये लक्षणं बदलत जातात.यामध्ये काही संकेत असे असतात जे तुमच्या नजरेतून सुटतात आणि लक्षात येत नाहीत. जसं की, कंबरदुखी, हिप्समध्ये वेदना, कोणत्याही कारणाशिवाय थकवा येणं.प्रोस्टेट कॅन्सरची अचूक कारणं स्पष्ट झालेली नाहीत. मात्र वाढतं वय, जेनेटीक फॅक्टर, हार्मोनल बदल या गोष्टी मुख्य भूमिका बजावतात. लठ्ठपणा, धुम्रपान, जेनेटिक, दारूचं सेवन, खराब लाईफस्टाईल या गोष्टी याची जोखीम वाढवतात.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश