सध्या हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र तु्म्हाला माहितीये का जवळपास सगळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामध्ये ४ महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत. एका मोठ्या अभ्यासाच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे. यामध्ये दोन मोठ्या देशांतील लोकांचा मेडिकल डेटा गोळा करण्यात आला. या डेटामधून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निकर्ष काढण्यात आलाय.तज्ज्ञांनी अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन देशातील तब्बल नऊ लाखांहून अधिक प्रौढ व्यक्तींच्या आरोग्याची माहिती घेतली. यामध्ये संशोधकांना असं आढळून आलं की, ९९ टक्के हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदयाच्या इतर समस्या या हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड शुगर आणि तंबाखूचं सेवन या ४ घटकांशी संबंधित होत्या.

हा अभ्यास अमेरिकेतल्या Northwestern Medicine आणि दक्षिण कोरियामध्ये असलेल्या Yonsei University मधील संशोधकांनी केला आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या हेल्थकेअर सिस्टीमधील लोकांनी माहिती घेण्यात आली. ज्यामध्ये वय, लिंग यांच्यावर या रिस्क फॅक्टरचा कसा परिणाम होतो ते पाहूयात.या संशोधनात असं दिसून आलं की, हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे सर्वात मोठा रिस्क फॅक्टर ठरला असल्याचं समोर आलं आहे. त्याचप्रमाणे हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर देखील तितकंच गंभीर असल्याचं समोर आलं आहे. याचप्रमाणे सध्याच्या काळात केलं जाणारं तंबाखूचं सेवन या धोक्याला वाढवत असल्याचं समोर आलं आहे.

या चार घटकांमुळे उद्भवणारी परिस्थिती डॉक्टरांना पूर्वीपासून माहिती होती. दरम्यान या अभ्यासामुळे त्यांनी लावलेले अंदाज अधिकच स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे नियमित तपासणीचं किती महत्त्वाची आहे हे समजतं. अनेक व्यक्तींन हाय शुगरचा त्रास असतो मात्र त्यांना लक्षणं दिसत नाही. परंतु ज्यावेळी हा त्रास असल्याचं समजतं तेव्हा उशीर झालेला असतो. अभ्यासातून समोर आलेल्या गोष्टींमुळे वयानुसार हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मात्र जर लोकांनी या रिस्क फॅक्टरवर नियंत्रण आणलं तर हार्ट अटॅकच्या प्रकरणांमध्ये घट होऊ शकते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश