सध्या तरुणांना कमी वयातच अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.(control) हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराने त्यांचा जागीच मृत्यू होत आहे. याचं कारण म्हणजे बदलती लाइस्टाइल आणि दुर्लिक्षित करणारी लक्षणे आहे. त्यातच हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेन्शन हा आजार जगभरातील कोट्यवधी लोकांना त्रास देत आहे. याची कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. म्हणून हा आजार झाल्याचं खूप उशीरा कळतं.जर वेळेवर उपचार केले नाहीत तर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. औषधं, संतुलित आहार आणि जीवनशैलीतले बदल यासोबतच काही सकाळी सेवन केलेले ज्यूस रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. मात्र, हे ज्यूस औषधांचा पर्याय नाहीत तर घरगुती हेल्दी राहण्याचे उपाय आहेत, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

जास्वंदचा चहा
जास्वंदचा चहा लालसर रंगाचा असतो. जो चांगल्या निरोगी (control)गुणधर्मांसाठी लोक सेवन करतात. या चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तवाहिन्या सैल करायला मदत करतात. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार, रोजच्या रोज दिवसातून दोन कप जास्वंदाचा चहा घेतल्याने कमी उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब कमी होऊ शकतो.

टोमॅटो ज्यूस
टोमॅटोच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि लाइकोपीनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. काही आठवडे रोज टोमॅटो ज्यूस सेवन केल्याने प्री-हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब कमी झाल्याचा फरक दिसतो.

डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रस अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स युक्त असतो. हे घटक रक्तवाहिन्यांच्या आतल्या थराचे संरक्षण करतात आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी मदत करतात. रोज डाळिंबाचा रस घेतल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब दोन्ही कमी होऊ शकतो.

ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात.(control) याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवतात आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करतात. नियमित ग्रीन टी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि धमन्यांवर होणारा ताण कमी होतो.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश