सोलापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.(photos)एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तीच जबरदस्तीने धर्मांतर करत लग्न करण्यात आलं आहे. या संतापजनक प्रकरणात संबंधित वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. इजराईल शेख, उजेब शेख, ऍड. अब्दुल्ला खतीब अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेतील (photos)आरोपी इजराईल शेख हा पीडित अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने पीडित मुलीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ मिळवत तिला ब्लॅकमेल केलं. त्यानंतर मित्र उजेब शेख याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.डिसेंबर २०२५ मध्ये पीडित मुलीला आरोपी इजराईलने लग्नाचे आमिष दाखवत तिला शहर काझी कार्यालयात नेलं. इथे ऍड. अब्दुल्ला खतीब याने लग्नासाठी धर्मांतर आवश्यक असल्याचे सांगत काही कागदपत्रावर तीची सही घेतली. दरम्यान जबरदस्तीने धर्मांतर करत तीचे लग्न लावल्यावर तिला काही महिने कर्नाटकातील कलबुर्गी येथे ठेवण्यात आलं.

मात्र त्या ठिकाणी आरोपीचे आतेभाऊ आणि त्याच्या आईने पीडित मुलीला मारहाण केली, (photos)https://en.wikipedia.org/wiki/Religious_conversionउपाशी ठेवून छळ केला असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीनंतर सोलापुरातील विजापूर रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

सिमेवरच्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण कळलं तर तुम्हीही हे उपाय लावाल

सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर