दिल्लीतील वसंत कुंज भागातल्या एका आश्रमाचा संचालक आणि स्वतःला बाबा म्हणवून घेणारा चैतन्यनंद गंभीर आरोपांमुळे अडचणीत सापडला आहे. श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील ३० हून अधिक विद्यार्थिनींनी त्याच्यावर लैंगिक छळ, छेडछाड, रात्री त्रास देणे आणि अश्लील मेसेज(Message) पाठवण्याचे आरोप केले आहेत. पीडित मुलींनी सांगितले की, चैतन्यनंद वारंवार व्हॉट्सअॅपवर “बेबी” म्हणत चॅट करायचा, रात्री उशिरापर्यंत मेसेज करायचा आणि अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांची चेष्टा करायचा.

इतकंच नव्हे तर विद्यार्थिनींच्या मार्कशीटमध्ये बदल करून त्यांना नापास करण्याची धमकी देत त्यांच्यावर दबाव आणण्याचेही प्रकार त्याने केले. एका स्कॉलरशिपवर शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तर उघड केले की, पहिल्याच भेटीत चैतन्यनंद तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत होता आणि वारंवार “आय लव्ह यू, तू खूप सुंदर आहेस” असे बोलून तिला त्रास देत होता. २००९ पासून त्याच्यावर अनेक वेळा अशाच प्रकारचे आरोप झाले असून छेडछाड, फसवणूक आणि खोटे ओळखपत्र मिळवण्याचे प्रकरणही त्याच्या नावावर आहे. मार्च २०२५ मध्ये पूजेच्या निमित्ताने मुलींना बोलावून परत येताना कारमध्ये विनयभंग केल्याचेही आरोप आहेत.

या प्रकारांमुळे घाबरलेल्या मुलींमध्ये एका माजी विद्यार्थिनीने, जी सध्या इंडियन एअरफोर्समध्ये ग्रुप कॅप्टन आहे, विद्यापीठ व्यवस्थापनाला पत्र आणि ईमेल पाठवत तक्रार केली होती. पीडितांपैकी बहुतेक मुली गरीब कुटुंबातील असल्याने त्यांचा शैक्षणिक गैरफायदा घेतल्याचेही समोर आले आहे. या सर्व गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील चौकशीमध्ये आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे(Message).

हेही वाचा :

का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या
अभिषेक शर्माची फटकेबाज अर्धशतकी खेळी; फ्लाइंग किसने रंगत वाढवली!
जया बच्चन यांनी अभिनेत्याला बेदम मारलं तेव्हा…