एका क्षुल्लक कारणावरून चक्क चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे.(breaks) हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे कुत्र्याच्या भुंकण्याच्या साध्या कारणावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वादाने रक्तरंजित स्वरुप धारण केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही क्षणांचे भांडण आणि त्यानंतर झालेल्या चाकूहल्ल्यात पिता-पुत्र जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पिता-पुत्रांना तात्काळ इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोघांवरही उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे जखमी झालेले अक्षय भरमा गौरोजी वय 30 आणि त्यांचे वडील भरमा गौरोजी हे राहतात. गौरोजी आणि जोशी कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहतात. 24 सप्टेंबर रोजी दिवसा कुत्रे भुंकण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. (breaks) गावकऱ्यांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवण्यातही आला होता. मात्र, त्याच रात्री साडेदहाच्या सुमारास श्रेयश जोशी, त्याची आई मंजिरी जोशी व त्यांचा एक मित्र हे तिघे गौरोजी यांच्या घरासमोर गेले. त्यावेळी “माझ्या मुलाला कुत्र्याच्या भुंकण्यावरुन बोलतोस काय? तुझी एवढी हिंमत?” असे म्हणत मंजिरी यांनी अक्षय गौरोजी यांना मारहाण केली. यानंतर श्रेयश आणि त्याच्या मित्राने अचानक चाकू काढून अक्षयवर वार केले.
अक्षयला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या वडील भरमा गौरोजी यांच्यावरही चाकूने यावेळी जोरदार वार करण्यात आले. या हल्ल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. आवाज ऐकून आजूबाजूचे शेजारी तातडीने घटनास्थळी धावून आले. जखमी अक्षय आणि भरमा यांना उपचारासाठी आधी आयजीएम आणि नंतर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.या चाकूहल्ला प्रकरणी अक्षय गौरोजी यांनी शहापूर पोलिस ठाण्यात श्रेयश जोशी, त्याची आई मंजिरी आणि आणखी एका मित्राविरोधात फिर्याद दिली आहे. तिघांविरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शहापूर पोलिस करत आहेत.

सध्या इचलकरंजी आणि परीसरात आधीच भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. (breaks) भटक्या कुत्र्यांकडून लहान मुले, वयोवृद्ध आणि पायी जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले होण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. त्यातच घडलेल्या या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून, कुत्रे भुंकण्यासारख्या किरकोळ कारणावरून अशा प्रकारचा रक्तरंजित प्रसंग घडल्याने संतापही व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं