इचलकरंजी : येथील डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयाचे प्राचार्य (presented)प्रो.डॉ. एस. के. खाडे यांना रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह, रोटरी क्लब ऑफ टेक्स्टाईल आणि रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘टीचर एक्सलन्स अवार्ड 2025’ नुकताच पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मा. प्राचार्य डॉ. संजय खोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी आपल्या एकूणच सेवा काळात एक विद्यार्थी प्रिय गुरुदेव कार्यकर्ते म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले आहे. वनस्पतीशास्त्र या विषयाचे अध्यापन करत अनेक विविध संशोधन देखील त्यांनी केले आहे.

प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांचा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समस्या ते स्वतः जाणून घेऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद करीत असतात. म्हणूनच त्यांची विद्यार्थी प्रिय प्राचार्य अशी ओळख आहे. “विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांशी संवाद असणे गरजेचे आहे. (presented)शैक्षणिक प्रगती बरोबर विद्यार्थी वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आम्ही शिक्षकांनी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मला मिळालेला हा पुरस्कार बापूजींचे संस्कार, सहकारी गुरुदेव कार्यकर्त्यांची सोबत आणि विद्यार्थी या सर्वांमुळे आहे.” अशा भावना यावेळी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी व्यक्त केल्या. रोटरी क्लबच्या चारही शाखांच्या वतीने त्यांना यंदाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य मा. अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या मा. सौ. शुभांगी गावडे,(presented) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या पुरस्कार सोहळ्यास रोटरी संस्थांचे श्री. घनश्याम सावलानी, श्री. संतोष साधले, श्री. प्रकाश लाहोटी, मा. शर्मिला साबळे, प्राचार्य डॉ. प्रशात कांबळे, डॉ. अमर कांबळे यांच्यासह रोटरीच्या चारही शाखेचे पदाधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांचे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा :

असं खाल तर लवकर जाल! 


 तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;


भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!