दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या सणानिमित्त मोठंमोठे फटाके फोडले जात आहेत. या फटाक्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड(record) करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही कोणतीही काळजी न घेता लक्षपूर्वक व्हिडीओ रेकॉर्ड केला नाही तर संपूर्ण व्हिडीओ खराब होऊ शकतो. एवढच नाही तर तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे चांगला व्हिडीओ कॅप्चर करता यावा आणि स्मार्टफोनचा कॅमेरा खराब होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, फटाक्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड(record) करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सावधगिरी बाळगल्यामुळे तुमचा फोन देखील सुरक्षित राहिल याशिवाय तुम्ही चांगला व्हिडीओ देखील कॅप्चर करू शकणार आहात. चला तर मग अशा पाच महत्त्वाच्या टिप्सबद्दल जाणून घेऊया.जर तुम्ही खूप जवळून फटाके रेकॉर्ड करत असाल तर याचा परिणाम तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा सेंसर, स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ आणि कॅमेरा क्वालिटवर होऊ शकतो. याशिवाय जास्तीचा प्रकाश तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेंसरला नुकसान पोहोचवू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, फटाक्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना ३ ते ४ फूटांच्या अंतरावर उभं राहा. ही पद्धत अतिशय सुरक्षित आहे.

फटाक्यांपासून निघणारा धूर आणि राख कॅमेरा लेंसवर जमा झाल्यास, व्हिडीओ ब्लर होऊ शकतो. एवढंच नाही तर जास्त काळापर्यंत धूर आणि राख कॅमेरा लेंसवर राहिल्यास स्कॅचचा धोका असतो. यासाठी व्हिडीओ रेकॉर्ड करताना वेळोवेळी तुमच्या कॅमेऱ्यांची लेंस साफ करा. ज्यामुळे व्हिडीओ क्लिअर आणि चांगल्या क्वालिटीचा असेल.सहसा असं पाहायला मिळतं की, सतत फोनचा वापर करून व्हिडीओ रेकॉर्ड केल्यास फोन जास्त गरम होतो. फोन गरम झाल्यास त्याच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो आणि फोनची बॅटरी हेल्थ खराब होऊ शकते. यामुळे कॅमेरा सेंरसवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, रेकॉर्डिंग केल्यानंतर ५ ते १० मिनिटे थोडा ब्रेक घ्या. तसेच, तुमचा फोन थंड जागी ठेवा.

एकदा व्हिडीओ केल्यानंतर कॅमेरा लेंस हलक्या आणि सूती कपड्याने साफ करा. यामुळे केवळ व्हिडीओची क्वालिटीच चांगली राहणार नाही तर तुमच्या कॅमेऱ्या लेंसची लाईफ देखील वाढणार आहे. आयफोनमध्ये, तुम्हाला लेन्स क्लीन अलर्ट फीचर देखील मिळते, दिवाळी दरम्यान ते चालू ठेवा.फटाक्यांच्या तेजस्वी प्रकाशामुळे अचानक कॅमेरा भरून जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, एक्सपोजर आणि ब्राइटनेस सेटिंग्ज ऑटो मोडवर ठेवणे चांगले. आवश्यक असल्यास, व्हिडिओमध्ये जास्त एक्सपोजर टाळण्यासाठी तुम्ही ब्राइटनेस कमी करू शकता.

हेही वाचा :

कुरुंदवाड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १२ जणांना अटक…
दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट
रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी