डीकेएएससी कॉलेज , इचलकरंजी मध्ये ५६ महाराष्ट्र बटालियन, कोल्हापूर यांच्यामार्फत डी के टी ई मराठी मिडीयम हायस्कूल नारायण मळा येथे महाविद्यालयाची नवीन एनसीसी कॅडेट प्रवेश प्रक्रिया(Process) ५६ महाराष्ट्र बटालियनचे ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल निखिल सक्सेना आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के.खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली.
डी के ए एस सी महाविद्यालयामध्ये ५६ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत एनसीसी विभाग गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या कार्यरत आहे. एनसीसी बटालियनचे विविध कॅम्प व आरडीसी परेड मधील यशस्वी सहभागाच्या माध्यमातून महाविद्यालयाचा एनसीसी विभाग नेहमीच यशस्वी वाटचाल करत राहिला आहे.

महाविद्यालयाचे शेकडो एनसीसी कॅडेट आज आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस अधिकारी व प्रशासनात कार्यरत आहेत. १९जागांसाठी पार पडलेल्या या प्रवेश प्रक्रियेत (Process)महाविद्यालयातील २००हून अधिक इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शारीरिक चाचणी (रनिंग, सीटअप्स, पुलअप्स, पुशअप्स), लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यांमधून ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. लवकरच बटालियन कडून या प्रवेश प्रक्रियेचा निकाल जाहीर होईल.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के.खाडे यांनी ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल निखिल सक्सेना यांचे व सर्व एनसीसी अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी ५६ महाराष्ट्र बटालियन चे सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण, सुभेदार भगीरथ, सुभेदार सुमंत यादव, सुभेदार माने, हवालदार संदीप गायकवाड, हवालदार रशविंदर सिंग उपस्थित होते. डी के टी ई मराठी मिडीयम हायस्कूल नारायण मळा येथे संपन्न झालेल्या या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे नियोजन प्रा. विनायक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी केले होते.

हेही वाचा :

माता न तू वैरिणी! पोटच्या एक महिन्याच्या लेकीचा खून 
३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! धबधब्याच्या काठावर गेला अन्…, VIDEO VIRAL
सावधान! ‘या’ लोकांसाठी नारळ पाणी म्हणजे विषच, एकदा प्यायले तर..