लखनऊ शहरातील मडियांव परिसरात एका १८ वर्षीय इंटरमिजिएट(student)विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. १५ ऑक्टोबरच्या रात्री विद्यार्थिनीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून आरोपींनी तिच्यावर अमानवी कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपींनी तिला नशायुक्त चहा पाजला आणि वारंवार अत्याचार केले. एवढेच नाही, तर एका आरोपीने तिला तब्बल चार दिवस बांधून ठेवल्यानंतर कुर्सीरोड येथे सोडून दिले आणि फरार झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी एका सरकारी शाळेत इंटरमिजिएट वर्गात शिकते. ती १५ ऑक्टोबर रोजी घरातील काही कारणाने रागावून शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली होती.(student) शाळेत गेल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत बीबीडीच्या दिशेने फिरायला गेली आणि दुपारी घरी परतून पुन्हा गोमतीनगरला एकटीच निघाली. रात्री परतताना ती रिक्षामध्ये बसली. परंतु खुर्रमनगरजवळ रिक्षा चालकाने रस्ता चुकला असे सांगत गाडी वेगळ्या दिशेने नेली. त्यामुळे विद्यार्थिनी घाबरली आणि रिक्षातून उतरली. याचवेळी दोन तरुण आणि एका तरुणीची कार त्या ठिकाणी आली. त्यांनी तिला घरी सोडण्याचे सांगत जबरदस्तीने कारमध्ये बसवले.विद्यार्थिनीचं म्हणणं आहे की कारमधील तरुण एकमेकांना अंशुमान, जुनैद आणि शिवांश अशी नावे घेत बोलत होते. कारमध्ये तिला नशायुक्त चहा पाजण्यात आला.
त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या अपराधानंतर आरोपी अंशुमन आणि शिवांश तेथून निघून गेले. तर जुनैदने विद्यार्थिनीला एका घरात नेऊन तिच्यावर पुन्हा-पुन्हा अत्याचार केले आणि चार दिवस तिला बांधून ठेवले.१८ ऑक्टोबर रोजी जुनैदने तिला कुर्सी रोडवर सोडले आणि पळून गेला.(student) घाबरलेल्या स्थितीत विद्यार्थिनी एका मैत्रिणीच्या घरी गेली. जिथून तिच्या कुटुंबीयांनी तिला परत घरी आणले. कुटुंबाने तिच्या बेपत्त्याची तक्रार पूर्वीच पोलिसांकडे दिली होती. मात्र, ती परत आल्यावर भीतीमुळे विद्यार्थिनी काहीच बोलली नाही. पुढील दिवशी आरोपी जुनैदने फोनवर आणि मेसेजद्वारे तिला पुन्हा धमकी दिली. त्यानंतरच विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबियांना सर्व काही सांगितले.

२२ ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनीचे कुटुंब पुन्हा पोलिस ठाण्यात गेले आणि तक्रार केली.(student) पोलिसांनी त्वरित कारवाई करत अंशुमान आणि जुनैद या दोघांना अटक केली. अंशुमन हा महानगरचा रहिवासी असून एका खाजगी विद्यापीठात एलएलबीचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील वायरलेस विभागात कर्मचारी आहेत. दुसरा आरोपी जुनैद सर्वोदयनगरचा रहिवासी असून सुतारकामाचे काम करतो. या प्रकरणात शिवांश आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचा शोध पोलिस घेत आहेत.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज; ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी जमा होणार
सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या