साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणीनं आयुष्य संपवलं. (chats)गुरूवारी हॉटेलमध्ये आयुष्याचा दोर कापला. या प्रकरणी डॉक्टर तरूणीनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांचा तपास सुरू आहे. तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर तरूणीने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आरोपानुसार, पोलिसांनी प्रशांत बनकरला पहाटे पुण्यातील फार्महाऊसवरून ताब्यात घेतलं. आरोपी प्रशांत बनकरला ताब्यात घेतल्यानंतर सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी साम टिव्हीच्या प्रतिनिधींना महत्वाची माहिती दिली आहे. पीडित डॉक्टर तरूणी आणि प्रशांत बनकर या दोघांमध्ये संबंध होते, अशी माहिती तुषार दोशी यांनी दिली. ‘तपासानंतर प्रशांत बनकरला ताब्यात घेण्यात आलं आहे. (chats)सध्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. डॉक्टर तरूणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती, अशी माहिती पोलीस तपासातून निष्पन्न झाली आहे’, अशी माहिती तुषार दोशी यांनी दिली.’पीडित डॉक्टर तरूणी आणि प्रशांत बनकर यांच्यात संबंध होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. चॅटिंगमधून बनकर आणि डॉक्टर तरूणी यांच्यात संबंध होते हे निष्पन्न झालं आहे’, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली. ‘या प्रकरणी पीएसआय गोपाल बदने यांचा काय सहभाग आहे? पीडित डॉक्टर तरूणी आणि पीएसआयचे काय संबंध होते का? याचा तपास सुरू आहे’, अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली.

‘डॉक्टर तरूणीचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाला आहे, हे शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे’, अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली. ‘प्रशांत घर मालक आहेत.(chats) बनकर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, तो पुण्यात राहत होता. तर, डॉक्टर तरूणी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती’, अशीही माहिती त्यांनी दिली. ‘हॉटेलचे डिव्हिआर जप्त केला आहे. गुरूवारी २३ तारखेला हॉटेलची रूम बुक केली होती. दरवाजा उघडला नाही, म्हणून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला’, अशी देखील माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज; ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी जमा होणार

सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या

पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल