इचलकरंजी :
इचलकरंजी शहरातील विविध मुख्य रस्ते, गल्ली–बोळ तसेच हायमॅस्ट(replace)परिसरातील स्ट्रीटलाईट व्यवस्था मागील काही महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी दिवे बंद असून काही ठिकाणी दिवे दिवसाढवळ्या सुरू राहतात. तसेच विद्युत खांबावरील लाईट बॉक्स पेट्या गंजलेल्या, तुटलेल्या आणि अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा इचलकरंजी पश्चिमचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना लेखी निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.(replace)दाभोळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, “शहरातील स्ट्रीटलाईट व्यवस्थेबाबत कित्येकदा तक्रारी दाखल करूनही संबंधित मक्तेदाराकडून कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. दरवेळी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते, परंतु काही तासांतच दिवे पुन्हा बंद पडतात. यावरून मक्तेदाराकडून कामात गंभीरतेचा व जबाबदारीचा पूर्ण अभाव दिसून येतो.”
ते पुढे म्हणाले की, “गंजलेल्या पेट्यांमुळे शॉर्टसर्किट, विजेचा धक्का किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. (replace)विद्युत विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडूनही त्या मक्तेदाराकडून दर्जेदार काम करून घेण्यासाठी आवश्यक ती कडक कार्यवाही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदाऱ्या निश्चित करणे आवश्यक आहे.”
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —
शहरातील सर्व बंद पडलेल्या स्ट्रीटलाईट व हायमॅस्ट दिव्यांची तातडीने व दर्जेदार दुरुस्ती करावी.
धोकादायक अवस्थेतील लाईट बॉक्स पेट्यांची तत्काळ (replace)अदलाबदल करून नव्या पेट्या बसवाव्यात.
संबंधित मक्तेदार कंपनीकडून शिस्तबद्ध कामकाज करून घेण्यासाठी नियमित तपासणी अहवाल मागवावा.
विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तपासणीची जबाबदारी द्यावी.
दुरुस्ती आणि देखभाल कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तपासणी पथक नियुक्त करावे.

दाभोळे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाले,(replace) तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज; ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी जमा होणार
सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या