भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेच्या समाप्तीनंतर, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नरने एक मोठा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियाने वन डे सिरिजमध्ये (cricket)भारताचा 2-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकले, तर भारताने सिडनी येथे झालेला तिसरा एकदिवसीय सामना 9 विकेट्सने जिंकला.

या एकदिवसीय सिरिझपूर्वीपासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच्या शक्यतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने केलेली एक खळबळजनक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की 2027 च्या विश्वचषकापर्यंत अजून दोन लोकप्रिय खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
डेव्हिड वॉर्नरने या एका व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मला रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा शुभमन गिल आणि गौतम गंभीर यांच्या 2027 च्या विश्वचषकातील स्थानाबद्दल जास्त शंका आहे.” डेव्हिड वॉर्नरचे हे विधान सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. पण, एका बातमीपत्राला वॉर्नरने कॉमेंट्री दरम्यान असे सांगितले की “नाही याची पुष्टी करू शकत नाही”.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय(cricket) सामन्यांमध्ये विराट कोहली एकही धाव न काढता बाद झाला. वाढत्या दबावाखाली त्याने सिडनीमध्ये नाबाद 74 धावा केल्या. दुसरीकडे, रोहित शर्माने 202 धावा करत मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून स्थान मिळवले. त्याने सिडनीमध्ये नाबाद 121 आणि अॅडलेडमध्ये 73 धावा केल्या.

रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही टी-20 आणि टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेतली आहे. आता दोघेही फक्त वन डे क्रिकेट खेळतात. टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे आणि रोहित आणि विराट त्या मालिकेत खेळताना दिसू शकतात. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही वन डे सिरिज 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.
हेही वाचा :
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम…
इथे जीव मुठीत ठेवून वाहने चालवावी लागतात!
सोनं खरेदीदारांना सर्वात मोठा दिलासा; सोनं ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त…