भारतीय क्रिकेट (cricket)संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या दुखापतीमुळे चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅच घेताना त्याच्या स्प्लिनला गंभीर मार लागला, ज्यामुळे त्याला तत्काळ सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. अय्यरच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून, वैद्यकीय टीम त्याच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करत आहे.

दरम्यान, मोटरसायकल रेसिंगच्या विश्वातूनही एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. स्विस मोटो-3 रायडर नोआ डेटविलरचा सेपांग इंटरनॅशनल सर्किट, मलेशिया मोटरसायकल ग्रां प्री 2025 दरम्यान भीषण अपघात झाला. रविवारी झालेल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये डेटविलर आपली बाइक धीम्या गतीने (cricket)चालवत असताना मोटो-3 चॅम्पियन जोस एंटोनियो रुएडाने त्याच्या बाइकला मागून धडक दिली. धडकेनंतर दोन्ही रायडर्स जमिनीवर कोसळले आणि त्यांना तात्काळ हेलिकॉप्टरने रुग्णालयात हलवण्यात आलं.
मिडिया रिपोर्ट्सनुसार डेटविलरची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याच्या पायाला फ्रॅक्चर, स्प्लिनला मार आणि फुफ्फुसांनाही दुखापत झाल्याचं समजतं. अपघातानंतर त्याला अनेकदा हृदयविकाराचे झटके आले असून, त्यामुळे त्याची स्थिती नाजूक बनली आहे. सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

फ्रेंच सीआयपी-केटीएम टीमने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, “आमचा रायडर नोआ डेटविलर गंभीर अपघातात जखमी झाला आहे. त्याच्यावर कुआलालंपुर रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तो सुरक्षित हातांमध्ये आहे, आणि त्याच्या खासगी आयुष्याचा सन्मान करण्याची आम्ही सर्वांना विनंती करतो. नोआ एक खरा योद्धा आहे, आणि संपूर्ण टीम त्याच्यासोबत उभी आहे.”या दोन घटनांनी क्रीडा विश्वात चिंता आणि प्रार्थना यांचं वातावरण निर्माण झालं आहे. चाहते श्रेयस अय्यर आणि नोआ डेटविलर यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, उरले फक्त काही तास, IMD चा हाय अलर्ट
‘माझे प्रायव्हेट व्हिडिओ..’ गर्लफ्रेंडकडून UPSCच्या विद्यार्थ्याची हत्या…
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; वीज कनेक्शन मिळणार फक्त ५ रुपयांत…