अनेक भारतीयांच्या दैनंदिन आहारात भात हा अविभाज्य घटक मानला जातो. पोळी-भाजीसोबत एक वाटी भात नसला, तर जेवण अपूर्ण वाटते. डाळ-भात, खिचडी, पुलाव किंवा बिर्याणी — भाताचे अनेक प्रकार जवळपास प्रत्येक घरात आवडीने खाल्ले जातात. मात्र, काहीजण वजन(weight) कमी करण्यासाठी किंवा आरोग्याच्या कारणास्तव भात खाणे टाळतात. पण जर एखाद्याने संपूर्ण एक महिना भात खाणे बंद केले, तर शरीरात कोणते बदल होतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

भात हा ऊर्जेचा सहज उपलब्ध स्रोत आहे. त्यामुळे जेव्हा आपण अचानक भात खाणे थांबवतो, तेव्हा शरीराला त्याची सवय बदलण्यासाठी थोडा वेळ लागतो. सुरुवातीला भूक जास्त लागणे, थकवा किंवा चिडचिड जाणवू शकते, कारण भातातील कार्बोहायड्रेट्स त्वरीत ऊर्जा देतात. तथापि, जर आपण आपल्या आहारात बाजरी, क्विनोआ, ओट्स, बार्ली, गोड बटाटे किंवा डाळी यांचा समावेश केला, तर शरीर हळूहळू या बदलाशी जुळवून घेते.
भात खाणे थांबवल्याने कॅलरीचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन घटण्यास मदत मिळते. त्यामुळे फिटनेस आणि डायट फॉलो करणारे लोक भाताचे सेवन मर्यादित करतात. तसेच, भाताऐवजी दलिया किंवा ओट्स खाल्ल्यास जास्त वेळ पोट भरल्यासारखे राहते आणि अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते.
पांढऱ्या भातामुळे रक्तातील साखरेची पातळी जलद वाढते, त्यामुळे महिनाभर भात न खाल्ल्यास साखरेची पातळी अधिक स्थिर राहते. हे मधुमेहग्रस्त लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. शिवाय, गोड पदार्थ खाण्याची सवयही हळूहळू कमी होते. जर तुम्हाला भात खाणे पूर्णपणे सोडवणे(weight) कठीण वाटत असेल, तर ब्राऊन राईसचा पर्याय वापरू शकता — यात फायबर जास्त आणि साखर नियंत्रणात ठेवणारे गुणधर्म असतात.काहींसाठी भात पचायला हलका असतो, पण काहींना त्याने गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. भात सोडल्यावर सुरुवातीला पचनात बदल जाणवू शकतात, मात्र भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचे सेवन वाढवल्यास पचन लवकर सुधारते.

भातात असणारे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स शरीरातील ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्ही दीर्घकाळ भात खाणे टाळले, तर या व्हिटॅमिनची कमतरता होऊ शकते. थकवा, मूड बदलणे किंवा अन्नाची विचित्र इच्छा यासारखे लक्षणे दिसू शकतात. म्हणून, भाताचा त्याग करताना आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, अंडी आणि दूध यांसारख्या पोषक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.एकूणच, भात खाणे सोडल्याने वजन नियंत्रण, रक्तातील साखर संतुलन आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत मिळू शकते — मात्र योग्य पर्याय आणि संतुलित आहार न घेतल्यास त्याचे उलट परिणामही शरीरावर दिसू शकतात.
हेही वाचा :
या खेळाडूला श्रेयस अय्यरसारखी दुखापत, त्यानंतर अनेकदा ह्दयविकाराचा झटका
जुन्या बॉय फ्रेंडसाठी नव्याला जिवंत जाळलं…
मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, उरले फक्त काही तास, IMD चा हाय अलर्ट