आयुष्यात ठराविक लोकंच आपली खूप खास असतात आणि खास व्यक्तींशीच अपण भावनिक होऊन कोणत्याना कोणत्या कारणांमुळे वाद घालतो. भांडणे तर होतंच राहतील पण यामंध्ये बऱ्याच वेळी आपण असं काही बोलून जातो ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या खोलवर मनाला ती गोष्ट लागते(love). परिणामी पश्चाताप करण्यापेक्षा आजच तुमची सवय बदला आणि या 5 गोष्टी करणे टाळा.

प्रियकर- प्रेयसी म्हटलं की छोटेमोठे वाद होतच असतात. कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतात. पण कालांतराने हीच छोटी भांडणं मोठ्या वादांमध्ये बदलतात. रागाच्या भरात आपण काही गोष्टी अशा बोलतो ज्यामुळे समोरच्याला ते खूप दुःखावतात. त्यामुळे आताच तुमच्या या पाच सवयी बदला आणि नातं तुटण्यापसून वाचवा.
दुसऱ्याशी तुलना करणे
बऱ्याचवेळी भांडताना आपण पर्टनरची तुलना इतरांशी करतो. कधी कधी एक्स पार्टनशी करतो त्यामुळे समोरच्याला वाईट वाटते. तुम्ही अजूनही एक्स पर्टनरचा विचार करता अशी शंका येऊ लागते.
चुक मान्य करा
वादविवाद होत असताना त्यातील नेहमी एकच व्यक्ती माघार घेते. चुक कोणाचीही असो माफी मगते, अश्याने ती व्यक्ती कंटाळते तुमच्या रागाला आणि प्रत्यकेवेळी खोटं ठरवण्याला. त्यामुळे दोघांनी चुक स्वीकारावी.
इमोशनल ब्लेकमेल करणे
समोच्याच्या जीवापाड प्रेमाचा(love) उपयोग करुन इमोशनल ब्लेकमेल केल्याने तुम्ही तुम्हाला खूप प्रेम करणारी व्याक्ती गमावता. त्या व्यक्तीला नाते ओझे वाटू लागते. प्रेमामध्ये कधी ही स्वैर वाटायला हवे. बांधुन किंवा अकवून ठेवल्यासारखं वाटत असेल तर नक्की तुमचं नतं सुंपष्टात येत.
संवाद साधा
बऱ्याच वेळा तुमचा व्यस्तपणा, मनसोक्त गप्पा न मारण्याचा स्वभाव तुमच्या पर्टनरला अस्वस्थ करु शकतो. कोणत्याही विषयावर चर्चा किंवा संवाद न झाल्याने समोरच्या व्यक्तीला असुरक्षीत वाटू लागते. कैक वेळी या गोष्टींना कंटाळून तुमचा पर्टनर डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो/शकते.
ब्रेकअपच्या धमक्या देणे
कोणत्याही वादात वारंवार नातं संपण्याच्या धमकीने नात्याचा पाया डगमगतो. तुमच्या जोडीदाला हे समजते की तुम्ही कोणत्याही अडचणीत किंवा कठीण परिस्थीतीत माघार घ्याल आणि ब्रेकअप कराल.
जर तुमच्याकडून या चुका होत असतील तर त्यांना लवकरात लवकर सुधारा पण तुमच्यावर कधी अशी परिस्थीती ओढावलीच तर समोरच्याला समजा ती व्यक्ती तुमच्याशी कोणत्या हेतूने बोलतेय. अशा वेळी विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा.
हेही वाचा :
अबू धाबीच्या वाळवंटात HOT पोझ देताना दिसली नताशा, सोशल मीडियावर नव्या फोटोची चर्चा
स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड