मोबाईलमध्ये शून्य बॅलन्स (balance)असतानाही कॉल करता येतो आणि मेसेजही पाठवता येतो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे आता पूर्णपणे शक्य आहे. आधुनिक स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या ‘बीकन लिंक’ (Beacon Link) नावाच्या खास फीचरमुळे हे घडत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते सिम, नेटवर्क किंवा रिचार्जशिवायही संवाद साधू शकतात.हे फीचर सर्व स्मार्टफोनमध्ये नसले तरी OnePlus, Oppo, Realme, Vivo, Infinix आणि Tecno या ब्रँडच्या फोनमध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी याला वेगवेगळी नावे दिली आहेत — उदा. OnePlus, Oppo आणि Realme मध्ये Beacon Link, तर Infinix आणि Tecno मध्ये Ultra Link म्हणून हे ओळखले जाते.

या फीचरची खासियत म्हणजे हे वॉकी-टॉकीसारखे काम करते. म्हणजेच, दोन फोन एकमेकांच्या मर्यादित रेंजमध्ये असले तर वापरकर्ते कॉल किंवा मेसेज करू शकतात. मात्र, हे फीचर फक्त एकाच ब्रँडच्या दोन डिव्हाइसदरम्यानच कार्यरत असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही OnePlus वापरत असाल तर समोरच्या व्यक्तीकडेही OnePlus फोन असणे आवश्यक आहे.

हे फीचर सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्यांनी फोनच्या(balance) सेटिंग्जमध्ये जाऊन ‘मोबाइल नेटवर्क’ सेक्शनमधील Beacon Link पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर हे फीचर चालू करून, फक्त कॉन्टॅक्ट्ससाठी किंवा सर्वांसाठी वापरायचे हे ठरवता येते. एकदा सक्रिय झाल्यावर, फोन आपोआप जवळच्या Beacon Link असलेल्या डिव्हाइस शोधतो आणि वापरकर्त्यांना नेटवर्कशिवाय संवाद साधण्याची सुविधा मिळते.या नव्या फीचरमुळे ग्रामीण भागात, पर्वतीय प्रदेशात किंवा नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही संवाद साधणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे ‘बीकन लिंक’ हे तंत्रज्ञान मोबाइल कम्युनिकेशनमध्ये एक क्रांतिकारी बदल घडवणारे ठरत आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीमध्ये विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली…
धनंजय मुंडे बोगस मतदानावर आमदार? माजी नगराध्यक्षाचे गंभीर आरोप
सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्… भयावह Video Viral