इचलकरंजी : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा (hockey)दिन म्हणून प्रशालेमध्ये उत्साहात संपन्न झाला. प्रतिमा पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ए एस काजी मॅडम यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक जिमखाना प्रमुख श्री बी एस माने यांनी केले. क्रीडा शिक्षक श्री के ए पाटील सर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाबद्दल विद्यार्थिनींना माहिती सांगितली.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. (hockey)त्यानंतर ह्या वर्षी विविध स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ ए एस काजी मॅडम यांनी विद्यार्थिनींना खेळाचे महत्व सांगून राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपस्थित प्रशालेचे उप प्राचार्य श्री व्ही जी पंतोजी, पर्यवेक्षिका व्ही एस लोटके मॅडम(hockey), पर्यवेक्षक एस एस कोळी सर, ज्येष्ठ शिक्षक डी डी कोळी सर, जिमखाना प्रमुख बी एस माने, क्रीडा शिक्षक के ए पाटील सर व सर्व खेळाडू उपस्थित होते.
हेही वाचा :
महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल