राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची (election)घोषणा झालेली असून 2 डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये नोव्हेंबरमधील शेवटचे दोन आठवडे नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या प्रचाराचे ठरणार आहेत. असं असतानाच दुसरीकडे राज्यसभा खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात एका खास सोहळ्याची लगबग असणार आहे. संपूर्ण पवार कुटुंब या सोहळ्यानिमित्त राजकीय मतभेद विसरुन एकाच मंचावर दिसणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यामुळेच पवार कुटुंबातील एक संभाव्य उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

ज्या सोहळ्याबद्दल आपण बोलतोय तो सोहळा आहे, शरद पवारांचे(election) नातू युगेंद्र पवार यांच्या लग्नाचा! युगेंद्र पवारांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण कोणतं असणार म्हणजेच वेडिंग डेस्टिनेशन कोणतं ही माहिती समोर आली आहे. युगेंद्र पवार हे बारामती नगरपरिषदेची निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांची आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेला चुलते अजित पवार यांच्याविरुद्ध बारामती मतदारसंघातून उभे राहिलेले युगेंद्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींपासून खासगी कारणामुळे दूर राहणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच युगेंद्र यांचा तनिष्का कुलकर्णीशी साखरपुडा झाला आहे. आता या दोघांच्या लग्नाची तारीख आणि लग्न कुठे असणार आहे हे सुद्धा समोर आलं आहे.
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा 30 नोव्हेंबर रोजी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंबाचं मूळ गाव असलेल्या ठिकाणी किंवा कर्मभूमि असलेल्या बारामतीमध्ये हा सोहळा पार पडणार नाहीये. शरद पवारांच्या नातवाचा विवाह सोहळा मुंबईतील प्रतिष्ठित अशा वांद्रे कुर्ला संकुलात म्हणजेच बीकेसीमध्ये पार पडणार आहे.
3 ऑगस्ट रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीत हॉलमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याचा खासगी कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं. तनिष्का कुलकर्णी मूळच्या मुंबईतील असून त्यांचे वडील नामवंत उद्योगपती आहेत. मुंबईतील प्रभादेवी परिसरातील तनिष्का राहतात. परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या तनिष्का यांचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले आहे. लंडनमधील कास बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी फायनान्स क्षेत्रात पदवी घेतली आहे.

हेही वाचा :
चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात…
बांगलादेश हिंसाचार प्रकरणात माजी पंतप्रधान दोषी, शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
पेन्शनधारकांनो ‘हे’ ऑनलाईन काम करा ,अन्यथा पेन्शन कायमची थांबेल!