दुखापतग्रस्त पंतच्या जागी दुसरा खेळाडू फलंदाजी करणार? जाणून घ्या ICC चा नियम

मँचेस्टर कसोटीत पहिल्याच दिवशी भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरली ती स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतला झालेली गंभीर दुखापत. या दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागतं. यामुळे एक मोठा प्रश्न समोर आला आहे की, आता जर पंत उर्वरित सामना खेळू शकला नाही, तर त्याऐवजी दुसरा फलंदाज(player) खेळू शकेल का? ICC चा नियम नक्की काय सांगतो? चला जाणून घेऊयात…

चौथ्या कसोटीत क्रिस वोक्सच्या एका यॉर्करने पंतच्या पायावर जबरदस्त मार लागला. यानंतर पंत वेदनेने विव्हळत होता आणि त्याला लगेच मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याच्या पायातून रक्तस्त्रावही झालं. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पण या घटनेनंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की पंत खेळू शकत नसेल, तर भारताला पर्यायी खेळाडू मिळू शकेल का?

ICC च्या नियमांनुसार, कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणजे असा पर्यायी खेळाडू(player), जो मूळ खेळाडूच्या जागी सर्व भूमिकांमध्ये (फलंदाजी, गोलंदाजी, फील्डिंग) खेळू शकतो. पण फक्त तेव्हाच, जेव्हा मूळ खेळाडूला डोक्यावर गंभीर दुखापत झाली असेल. उदाहरणार्थ, जर पंतला डोक्यावर बॉल लागला असता, तर भारत ध्रुव जुरेलसारखा विकेटकीपर-फलंदाज त्याच्या जागी उतरवू शकला असता.

पण पंतच्या बाबतीत डोक्याऐवजी पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे कन्कशन सब्स्टिट्यूटची अट पूर्ण होत नाही. अशा वेळी, नियमांनुसार भारताला फक्त फील्डिंग सब्स्टिट्यूट दिला जाऊ शकतो. म्हणजेच दुसरा खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण किंवा विकेटकीपिंग करू शकतो पण न फलंदाजी करू शकतो, ना गोलंदाजी. याचा अर्थ असा की, पंत सामन्याला परतला नाही तर भारताला फक्त 10 फलंदाजांसह डाव उभारावा लागेल.

पंतला ही दुखापत झाली ती भारताच्या डावातील 68व्या षटकात. क्रिस वोक्सच्या यॉर्करवर पंतने रिव्हर्स-स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट त्याच्या पायाला लागला. यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आलं. सध्या त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे आणि त्याच्या पुढील खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे.

हेही वाचा :

नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी

मुंबईहून गोवा अवघ्या १२ तासांत पोहचा.., भारतात पहिल्यांदाच सुरु होणार फेरी सेवा

नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे