उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यापैकी बरेच जण गरम पाण्याने अंघोळ करतात.(pressure)असंच थंड पाण्याने आंघोळ करणं आज जगभरात एक लोकप्रिय वेलनेस ट्रेंड बनलाय. विशेषतः खेळाडू याला मानसिक एकाग्रता, चांगला मूड, रक्ताभिसरण सुधारणं आणि तणाव कमी होण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन मानतात.मात्र नवीन संशोधनानुसार थंड पाण्याचा संपर्क शरीरातील प्राचीन सर्व्हायवल मेकॅनिझम एक्टिव्ह करतो. हे दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतं पण सुरुवातीला रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. हा त्रास खासकरून हृदयविकार असलेल्या लोकांना होण्याचा धोका असतो.

फोर्टिस हॉस्पिटल गुरुग्रामचे कार्डिओ थोरॅसिक व्हॅस्क्युलर सर्जरी (pressure)विभागाचे प्रमुख डॉ. उद्गीथ धीर यांनी सांगितलं की, “थंड पाण्याचा संपर्क हा फक्त थंडी जाणवण्यापुरता नसतो. तर यामुळे तुमची हृदयवाहिनी प्रणाली लगेच आणि तीव्रतेने प्रतिक्रिया देते.”ज्यावेळी बर्फासारखे थंड पाणी तुमच्या शरीरावर पडतं तेव्हा तेव्हा शरीर कोल्ड शॉक रिस्पॉन्स अनुभवतं. हा रिस्पॉन्स उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि महत्त्वाच्या अवयवांचं संरक्षण करण्यासाठी असतो. डॉ. धीर यांनी सांगितलं की, “थंड पाणी त्वचेवरील रक्तवाहिन्या आकुंचन करतं, याला व्हॅसो-कॉन्स्ट्रिक्शन म्हणतात. रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने प्रतिकार वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब तात्पुरता वाढतो.”

थंड पाण्याचा केवळ त्वचेवरच परिणाम होत नाही. (pressure)युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या संशोधनानुसार अचानक थंड पाण्याचा संपर्क पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेसिस्टन्स वाढवतो, ज्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब दोन्ही वाढतात. थंड पाण्याचा संपर्क हा शरीरासाठी एक स्ट्रेसर असतो. त्यामुळे सिंपथेटिक नर्व्हस सिस्टीम एक्टिव्ह होते आणि अॅड्रेनालिन आणि नॉर-अॅड्रेनालिन हे हार्मोन्स रिलीज होतात. हेच हार्मोन्स फाइट-ऑर-फ्लाइट प्रतिसादात महत्त्वाचे असतात.

बहुतेक निरोगी लोकांमध्ये रक्तदाब वाढ काही वेळेपुरती असू शकते. यानंतर शरीर लगेच स्थिर होतं. काही संशोधनानुसार, नियंत्रित आणि नियमित थंड पाण्याचा संपर्क रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवू शकतो. ज्यामुळे दीर्घकाळ हृदयाचे आरोग्य सुधारू शकतं.

कोणाला काळजी घ्यावी लागेल?
थंड पाण्याने आंघोळ खालील लोकांसाठी शिफारस केलेली नाही:
अनियंत्रित उच्च रक्तदाब असलेले रूग्ण
हृदयविकार किंवा ब्लॉकेज असलेले रूग्ण
हृदयाची लय बिघडलेली असलेले
हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा इतिहास असलेले
अचानक वाढलेला दबाव आणि सिंपथेटिक सक्रियता हृदयावर ताण आणू शकते. हृदयविकार असलेल्या लोकांनी थंड पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सुरक्षित थंड पाण्याने अंघोळ करण्याचे टीप्स
जर तुम्ही निरोगी असाल आणि थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार करत असाल, (pressure)तर खालील उपाय उपयुक्त ठरतील
पूर्ण शरीरावर अचानक पाणी टाकू नका- सुरुवात हात-पायांपासून करा, नंतर खांदे. डोक्यावर किंवा छातीवर लगेच पाणी टाकू नका.
श्वसन नियंत्रित ठेवा- हळूहळू श्वास सोडल्याने घाबरून श्वास घेण्याची प्रतिक्रिया कमी होते.
कमी वेळ- सुरुवातीला 30-90 सेकंद पुरेसे आहेत.
सकाळी उठल्यावर लगेच अंघोळ टाळा- सकाळी रक्तदाब नैसर्गिकरीत्या जास्त असतो.

हेही वाचा :

गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या

कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द

‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEditEdit